शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 3:04 PM

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमहान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत धरणातील अत्यल्प जलसाठा ध्यानात घेता, शहरावर जलसंकटाचे सावट आहे. उन्हाळ््यात महान धरण व कापशी तलावातील गाळ उपसल्यास जलसाठ्यात वाढ होईल, या विश्वासातून सत्ताधारी भाजपा व महापालिका प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.अकोलेकरांना महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. परिणामी धरणात नऊ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असली, तरी तोपर्यंत अकोलेकरांना धरणातील मृतसाठ्यातून पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, उन्हाळ््यात धरण कोरडे होणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे. महान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला असून, पाटबंधारे विभागाकडून तशी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती आहे.मनपाकडून जलजागृती सप्ताहसंभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. नळ कनेक्शन वैध करून घेतल्यास वैधतेच्या रकमेच्या बदल्यात लागणाºया रकमेतून २५ टक्के रक्कम माफ केली जाईल. तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपाजवळ जलपुनर्भरणाची उपाययोजना केल्यास मनपातर्फे १२५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जलवाहिनी फुटल्यास जलप्रदाय विभागातील अधिकाºयांसह १८००२३३५७३३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण