शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आंदाेलन; परत केले तुटपुंज्या विम्याचे चेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 16:57 IST

Farmer's Agitation at Akola तुटपुंज्या विम्याचे चेक जिल्हाधिकारी यांना परत केले असून विमा कंपनीच्या विराेधात राेष व्यक्त केला.

अकाेला :अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून त्यांना फळ पीक विम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर झाली आहे. ज्या विम्याचा प्रिमिअम आठ हजार आहे, त्या विम्यापाेटी केवळ हेक्टरी २६५ तर काहींना ५०० रूपये मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. विम्याचा दावा देतांना विमा प्रतिनिधीने भेदभाव केला तसेच शेतकऱ्यांशी त्यांची उध्दट वागणुक असल्याची तक्रार घेऊन साेमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी तुटपुंज्या विम्याचे चेक जिल्हाधिकारी यांना परत केले असून विमा कंपनीच्या विराेधात राेष व्यक्त केला.

अकाेट तालुक्यातील पणज, अाकाेलखेड महसूल मंडाळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक अशाेक वाटीकेपासून केळीचे खांब हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माेर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयात माेर्चा आल्यानंतर पाेलीसांनी माेर्चा अडविला.  त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथेच ठिय्या मारला. रविकांत तुपकर , सतिष देशमुख आदीसह काही निवडक शेतकऱ्यांसाेबत जिल्हाधिकारी यांनी नियाेजन भवनात संवाद साधुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ४५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असताना तुटपुंजी रक्कम मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. फळ िपक िवम्याचा लाभ िमळण्यासाठी जिल्ह्यातील ६०० पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी िवमा काढला हाेता.मात्र विमा कपंनीने फसवणुक केली एकिकडे राज्य सरकार या नुकसान भरपाई पाेटी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी मदत देत असताना िवमा कंपनीने शेतकऱ्यांची तुटपूंज्या रकमेवर बाेळवण केली असा आराेप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

 

विमा प्रतिनिधी निलंबीत

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाेबत उद्धट वागणुक करणारा व शेतकऱ्याना एफआयआरची धमकी देणारा विमा प्रतिनधी अखेर निलंबीत करण्यात आला. सपकाळ असे या प्रतिनिधींचे नाव असून विम्याचा दावा देतांना यांनी प्रचंड भेदभाव केल्याचे शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी उघड केले या प्रतिनिधीवर कारवाई हाेणार नाही ताे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय साेडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती. त्याची दखल जिल्हाधिकारी यांना घ्यावीच लागली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातच साेडल्या शिदाेऱ्या

अकाेट तालुक्यातून सकाळीच मिळेल त्या वाहनाने शेतकरी अकाेल्यात दाखल झाले हाेते. पाणी व शिदाेरी असे साहित्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयातच शिदाेऱ्या साेडल्या. जाे पर्य्ंत न्याय मिळत् नाही ताे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय न साेडण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती.

 

शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षात आला आहे या संदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक यांना सूचीत केले असून येत्या आठवडययात हा प्रश्न मार्गी लागेल असा प्रयत्न केला जाईल.

- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकाेला

 

मस्तवाल विमा प्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या दबावापाेटी पदावरून हटविले आहे मात्र एवढयावर हे आंदाेलन संपले नाही जाे पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळत् नाही ताे पर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल प्रसंगी पुन्हा आंदाेलन करू.

- रविकांत तुपकर, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAkolaअकोला