शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ट्रांसजेंडर विधेयकाविरुद्ध किन्नरांचे २० जानेवारी रोजी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:20 IST

अकोला : लोकसभेत ट्रांसजेंडर विधेयक पास करण्यात आले असून, या विरोधात देशभरातील किन्नर समाजाने लढा देण्याची तयारी केली आहे.

अकोला : लोकसभेत ट्रांसजेंडर विधेयक पास करण्यात आले असून, या विरोधात देशभरातील किन्नर समाजाने लढा देण्याची तयारी केली आहे. आपल्या मौलिक अधिकाराच्या बचावासाठी देशभरातील किन्नर समाज दिल्ली स्थित जंतर-मंतर मैदानावर २० जानेवारी रोजी आंदोलन करणार आहे. यासाठी जिल्ह्यातून २०० पेक्षा जास्त किन्नर सहभागी होणार असल्याची माहिती जन सत्याग्रह संगठन किन्नर सेलच्या अध्यक्ष गुरु सिमरन नायक अम्माजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.आंदोलनाच्या रुपरेषेसंदर्भात सोमवार, १४ जानेवारी रोजी संगठनतर्फे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लोकसभेत मांडण्यात आलेल्या ट्रांसजेंडर विधेयकाला आमचा विरोध नाही; पण या विधेयकामुळे इतिहासापासून सुरू असलेली गुरु-चेला ही परंपरा नष्ट होण्याचा धोका आहे. शिवाय, विविध उत्सवाच्या काळात आशीर्वाद देताना स्वीकारण्यात येणारे दान हे भीक म्हणून दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने या दोन मुद्याला किन्नरांचा विरोध आहे. गुरू-चेला ही परंपरा कायम राहावी, यासाठी आमचा लढा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. किन्नर हे सर्वच जाती, धर्मात जन्माला येतात. त्यामुळे त्यांच्या जातीचा प्रवर्गदेखील वेगवेगळा आहे; परंतु त्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रकारदेखील चुकीचा आहे. त्यामुळेच ट्रांसजेंडर विधेयक थांबविण्यात यावे, राज्यसभेमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात येऊ नये, त्यामध्ये सुधारणा करून किन्नरांना रोजगार, संस्कृती जतन करण्याचा अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये, आदी मागण्यांसाठी २० जानेवारी रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर किन्नर समाज आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला गुरु सिमरन नायक अम्माजी यांच्यासह मुस्कान गुरू सिमरन अम्माजी, मोगरा गुरू सिमरन अम्माजी, मुस्कान गुरु सिमरन अम्माजी, प्रिया गुरू सिमरन अम्माजी, ईश्वरी गुरू सिमरन अम्माजी, सना गुरू सिमरन अम्माजी, मेघा गुरू आलीया, रारिका गुरू मुस्कान, चांदनी गुरू सना यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाTransgenderट्रान्सजेंडरagitationआंदोलन