शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

माउंट कारमेलचे प्राचार्य ‘हाजीर हो’; बालहक्क न्याय समितीचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:48 IST

अकोला : अकोला-शहरातील प्रसिद्ध  माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या  विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्राचार्याला चांगलेच महागात पडले आहे. पालकांनी यासंदर्भात बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने माउंट कारमेलच्या प्राचार्याला १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्दे एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या  विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्राचार्याला चांगलेच महागात पडलेपालकांनी केली होती बालहक्क न्याय समितीकडे तक्रार

सचिन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-शहरातील प्रसिद्ध  माउंट कारमेल इंग्रजी शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट मिळाल्यानंतर चौकशी न करता त्या  विद्यार्थ्याला लेखी नोटीस देणे माउंट कारमेलच्या प्राचार्याला चांगलेच महागात पडले आहे. पालकांनी यासंदर्भात बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने माउंट कारमेलच्या प्राचार्याला १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राम नगरातील रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍याचा मुलगा माउंट कारमेल शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट आढळले, यावरून प्रचंड वादंग झाल्यानंतर प्राचार्याने विद्यार्थ्यास नोटीस देऊन शाळेतून कमी करण्याचे नमूद केले; मात्र हा प्रकार मुलाच्या वडिलांना खटकल्याने त्यांनी बालहक्क न्याय समितीकडे तक्रार केली. त्यावर चौकशी झाल्यानंतर   समितीने प्राचार्याला बालहक्क न्याय समितीसमोर १९ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रामदासपेठ पोलीसही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणीविद्यार्थ्याच्या दप्तरात सिगारेटचे पाकीट आढळल्यानंतर प्राचार्याने त्याच्या कुटुंबीयांना लेखी नोटीस दिली. या नोटीसनंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता प्राचार्य यांना सोबत घेऊन विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी केली; मात्र त्यामध्ये विद्यार्थी निर्व्यसनी असल्याचे स्पष्ट झाले.विद्यार्थ्याने त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात एकदाही सिगारेट ओढली नसल्याचे समोर आल्याने हे पाकीट त्याच्या दप्तरात ठेवणार्‍याचा शोध घेण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

नोटीसमधील उल्लेखप्राचार्याने या विद्यार्थ्याच्या घरी एक नोटीस पाठविली. या नोटीसमध्ये विद्यार्थ्यास शाळेतून कमी करण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. मुलगा सिगारेट ओढत असल्याचे सांगत त्याच्यावर ताशेरे ओढले, त्यामुळे त्याचे वडील संतापले; मात्र त्यांनी या प्रकरणात घाई न करता मुलाला धीर देत प्रकरणाच्या खोलात गेले. मुलगा निर्व्यसनी असल्याचे समोर आले. पित्याने मुलावर राग काढला असता, तर प्रकरण वेगळय़ाच दिशेने गेले असते, हे निश्‍चित.सदर विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळलेले सिगारेटचे पाकीट हे सौदी अरेबियातील असल्याचे समोर आले आहे. ते त्याच्या दप्तरात कसे काय आले, हा मोठा प्रश्न असून, सदर प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळाCourtन्यायालय