लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शहरातील एका डॉक्टरला भरधाव कारने धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. डॉ. रामेश्वर भोपळे आणि प्रशांत सरनाईक हे बुधवारी सकाळी ७ वाजता बाहेर फिरायला गेले असता, एमएच ३० एएफ ८७११ क्रमांकाच्या वाहनाने डॉ. रामेश्वर भोपळे यांना उडविले. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉ. रामेश्वर भोपळे आणि प्रशांत सरनाईक हे त्यांच्या दैनंदिनीनुसार मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. गोरक्षण रोडस्थित चार बंगल्याजवळून जात असताना एमएच ३० एएफ ८७११ क्रमांकाची कार भरधाव आली आणि डॉ. भोपळे यांच्यावर धडकली. अपघातात डॉ. भोपळे जखमी झाले. त्यांना तत्काळ सर्वाेपचारमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रशांत दिनकर सरनाईक यांनी खदान पोलीस ठाण्यात कारचालक डॉ. अशोक सुखदेव गाडगे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मॉर्निंग वॉक करणाऱ्या डॉक्टरला कारची धडक
By admin | Updated: May 26, 2017 02:51 IST