शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह आईचा पाण्यात बुडून मृत्यू; अकोल्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:45 IST

दरम्यान मुलगी गेटच्या जवळ गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली.

अकोला: पारद येथील रहिवासी असलेले गौरव सुरेश तायडे (३२), पत्नी प्रिया गौरव तायडे (२८) व मुलगी आराध्या (२) हे तिघे नदीपलीकडे असलेल्या दर्यापूर तालुक्यातील धामोडी या गावी मावशीच्या अंत्यविधीला गेले होते. अंत्यविधी आटोपून दुसऱ्या दिवशी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान परत येत असताना बॅरेजजवळ आल्यानंतर गेट बंद असल्याने चौकीदार संजय भाऊराव गवई यांना चावी मागितली.

दरम्यान मुलगी गेटच्या जवळ गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आई प्रिया व वडील गौरव यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी चौकीदार संजय गवई यांनी आरडाओरडा केला. बाजूला असलेले काही युवक धावून आले व त्यांनी पाण्यात दोर फेकला. या दरम्यान माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, परंतु वडील गौरव यांनी दोर पकडल्याने त्यांचे प्राण वाचले.

‘तो’ भाग दर्यापूर पोलिसांच्या हद्दीत

घुंगशी बॅरेज पारद येथे असले तरी घटनास्थळाचा भाग दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस व जिल्हा शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाने शोधमोहीम सुरू करताच प्रथम आई (प्रिया) हिचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर चिमुकली आराध्या हिचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूर येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस करीत आहेत.

घटनेबाबत चौकशी व्हावी; प्रियाच्या वडिलांची तक्रार

मृत प्रिया गौरव तायडे व तिची मुलगी आराध्या यांच्या मृत्यूबद्दल प्रियाचे वडील विठ्ठल गोविंदराव फुंडकर (रा. हनवतखेडा) यांनी आक्षेप घेत दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून किंवा उडी घेतली की त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आले, अशी शंका उपस्थित करून या आशयाची तक्रार दर्यापूर पोलिसात दाखल केली.

टॅग्स :AkolaअकोलाDeathमृत्यू