शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

‘मोर्णा स्वच्छता मिशन: नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटली महिलाशक्ती; पाच हजार महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 15:39 IST

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देशनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.स्वच्छता मोहीमेत गीता नगर भागातील मोर्णा नदीकाठी महिलांची गर्दी उसळली होती.स्वच्छता मोहिमेत जवळपास पाच हजार महिलांनी सहभाग घेतला.

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला. त्यामुळे ‘मोर्णा माय’ स्वच्छतेसाठी शहरातील महिलाशक्ती धावल्याचा प्रत्यय आला.जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने लोकसहभागातून मोर्णा स्वच्छता मोहीम गत १३ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आली. दर शनिवारी लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत गीता नगर भागातील मोर्णा नदीकाठी महिलांची गर्दी उसळली होती.

पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, आमदार हरिष पिंपळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखॉ पठाण, उपमहापौर वैशाली शेळके, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकाºयांच्या पत्नी तथा वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, माजी महापौर सुमन गावंडे, नगरसेवक हरिष आलीमचंदानी, नगरसेविका उषा विरक, किरण बोराखडे,रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजीतसिंह बछेर, मनपा सहाय्यक आयुक्त डॉ.दिपाली भोसले, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, जिल्हाधिकाºयांचे सासरे ठाणे येथील अनिल पाटील, तहसीलदार राजेश्वर हांडे, पातूरचे तहसीलदार डॉ.रामेश्वर पुरी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह नगरसेविका, महिला बचतगट, वस्तीस्तर संघ, महिला मंडळांसह अधिकाºयांच्या पत्नी, महिला अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडीसेविका व शहरातील गृहीणी सहभागी झाल्या होत्या. स्वच्छता मोहीमेत नदीपात्रातील जलकुंभी व कचरा काढण्यात आला. स्वच्छता मोहिमेत जवळपास पाच हजार महिलांनी सहभाग घेतला.त्यामुळे ‘मोर्णा माय’ स्वच्छतेसाठी शहरातील महिला शक्ती एकवटल्याचा प्रत्यय आला.

महिला बचतगट, वस्तीस्तर संघांचा उत्स्फूर्त सहभाग !मोर्णा स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध महिला बचतगट आणि वस्तीस्तर संघांच्या पदाधिकारी-सदस्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये मनपा क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर व त्यांच्या पत्नी मंगला घनबहाद्दूर यांच्या समवेत श्रध्दा वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष सुनंदा शिंदे, माऊली वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष अनिता मारवाल, वेणू गायधने, सार्थक वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष इंदू एललकार, एकता वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष पार्वती लहाने  यांच्यासह पूजा मनवर, दुर्गा रायझडप,पूनम जाबुकस्वार, सुशीला उमाळे, रहेमुन्नीसा, पूजा बुंदेले, कांता घावडे, मंगला घावडे, माया घाडगे, कविता सोनोने, तसेच इतर महिला बचतगट व वस्तीस्तरसंघाच्या पदाधिकारी महिलांनी सहभाग घेतला.

आदित्य ठाकरेचा मोर्णाकाठी सत्कार !मोर्णा स्वच्छता मोहिमेत १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याच्यासह त्याच्या सहकाºयांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्णा नदीकाठी आदित्य ठाकरेचा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमMorna Riverमोरणा नदीAkola cityअकोला शहर