शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी तीन शिक्षकांच्या बडतर्फीला स्थगनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:55 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेत राखीव जागांवर रुजू होताना जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या शिक्षकांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतलेल्या आणखी तीन शिक्षकांवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेने दाखल केलेल्या कॅव्हेट निष्प्रभ असल्याचे पुढे येत आहे.

ठळक मुद्देआणखी तीन शिक्षकांच्या बडतर्फीला स्थगनादेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या सेवेत राखीव जागांवर रुजू होताना जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या शिक्षकांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतलेल्या आणखी तीन शिक्षकांवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेने दाखल केलेल्या कॅव्हेट निष्प्रभ असल्याचे पुढे येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जात वैधता सादर न करणार्‍या ४४ पैकी २३ शिक्षकांना बडतर्फ, तर आंतर जिल्हा बदलीने राखीव जागेवर पदस्थापना मिळालेल्या १२ शिक्षकांना मूळ जिल्हय़ात परत पाठवण्याचा आदेश ३ व ९ ऑक्टोबर रोजी दिला. त्या आदेशाला शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिल्यास जिल्हा परिषदेची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आले. सोबतच बिंदूनामावलीही अंतिम करण्याचा प्रस्ताव मागासवर्ग कक्षाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, कारवाईचे आदेश मिळालेल्या शिक्षकांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यामध्ये अकोला पंचायत समितीमधील सचिन रामधासिंग राजपूत, अशोक गोपालसिंह चुंगडे यांच्यासह आतापर्यंत जवळपास आठ शिक्षकांच्या बडतर्फीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर तेल्हारा पंचायत समितीमधील मो. सलीम मो. इकबाल, विजय पांडुरंग वाकोडे, मूर्तिजापूर, मो. तसद्दूक मो. गौस यांच्यावरील कारवाईला सोमवारी स्थगिती दिली. न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी, स्वप्ना जोशी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. बडतर्फ शिक्षकांची बाजू अँड. राम कारोडे मांडत आहेत.

मूळ जिल्हय़ात परत पाठवण्याचे आदेशही स्थगितसोबतच आंतरजिल्हा बदलीतील मूळ जिल्हय़ात परत पाठवल्या जाणार्‍या किसन श्रीराम पिंपळकर, किरण रामदास लहाने, योगिता मारोतराव खोपे, किरण विश्‍वास पाटील यांच्यावरील कारवाईलाही स्थगिती देण्यात आली आहे. 

दिव्यांग शिक्षकांच्या प्रकरणात आज सुनावणी दरम्यान, जिल्हा परिषदेत मोठय़ा प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक रुजू झाले आहेत. त्यांच्यावर कारवाईच्या मागणीचा मुद्दा रेटला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणही सुरू करण्यात आले आहे. त्या शिक्षकांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यावर न्यायमूर्ती धर्माधिकारी, जोशी यांच्यासमोर उद्या मंगळवारी सुनावणी होत असल्याची माहिती आहे.  

टॅग्स :zpजिल्हा परिषद