शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कजाकिस्तानातील ‘माँटेग्यू हॅरिअर’ करताहेत बोरगाव परिसरात स्वच्छंद विहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:57 IST

अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजगण स्वच्छंद विहार करीत असल्याचे दिसून आले. 

ठळक मुद्देपाहुण्या पक्ष्यांचे अकोला जिल्हय़ात आगमन

राम देशपांडेअकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजगण स्वच्छंद विहार करीत असल्याचे दिसून आले. कजाकिस्तानात संख्येने ८७ टक्क्यांहून अधिक वास्तव्य असलेला ‘माँटेग्यू हॅरिअर’ हा घार प्रजातीतील पक्षी असून, ज्या-ज्या भागात शीतलहर असते, त्या-त्या भागात तो स्थलांतरित होत असतो. एका वेळेस ३ ते ४ हजार कि.मी.चा प्रवास करणारे हे पक्षी सध्या अकोला जिल्हय़ात आले असून, बोरगाव मंजू परिसरात स्वच्छंद विहार करीत आहेत. या पक्ष्यांचे मुख्य खाद्य हे सरडे, पाली, उंदीर व छोटे पक्षी असून, तलावाच्या काठावर किडे टिपणार्‍या लहान पक्ष्यांना तो सहज वरच्यावर उचलून आपले भक्ष्य बनवतो. सायबेरिया, नॉर्थ कजाकिस्तान, वेस्ट चायना या भागात तो आपली वंशावळ वाढवतो. शीतलहर परसरताच तो भारत, आफ्रिका व आशियाई देशात स्थलांतरित होतो. झेप घेताच २५ ते ३0 कि.मी. सहज प्रवास करून खाद्य उचलून मूळ ठिकाणी तो परत येतो. कजाकिस्तानातील एका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या पक्ष्यांच्या मानेवर सॅटेलाइट टॅग्ज लावले आहेत. सोलर उर्जेच्या साहाय्याने ते चार्ज होत असल्यामुळे, ते पृथ्वीतलावर ज्या ज्या भागात जातात, त्या त्या भागातील वातावरणाची माहिती शास्त्रज्ञांना सहज कळते. तसेच प्रत्येक पक्ष्याच्या पायात रबरी रिंगद्वारे नंबर टॅग लावण्यात आले आहेत. मुख्यत्वे या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन हा त्यामागचा मूळ हेतू स्पष्ट होतो. पक्ष्यांची व हवामानातील बदलांची अचूक माहिती टिपता यावी, यासाठी या पक्ष्यांच्या मानेवरच टॅग्ज रोपण करण्यात आले असून, त्यांचा त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षतादेखील घेण्यात आलेली आहे. या सर्व बाबी सोमवारी पक्षी निरीक्षण करीत असताना प्रशांत गहले यांना दृष्टीस पडलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’च्या अवलोकनानंतर दिसून आल्या.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणbirds sanctuaryपक्षी अभयारण्य