शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-यास चार वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:56 IST

अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाआरोपी विकृत सवयीचा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरपूर येथील रहिवासी एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या २८ वर्षीय पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला.हिरपूर येथील एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसोबत तिच्या झोपडीमध्ये २२ जानेवारी २०१४ रोजी झोपलेली होती. या झोपडीला तूरीच्या काड्याचे दार असल्याने सदरचे दार उघडून आरोपी पुरुषोत्तम सूर्यभान तायडे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली, त्यामुळे तिच्या वडील आणि भावाने धाव घेऊन आरोपी तायडे यास पकडले.तायडेने दोघांच्या तावडीतून सुटून जाण्यासाठी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या वडिलांना लागल्यामुळे आरोपीस पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी पुरुषोत्तम तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४अ, ४४८ आणि पॉस्को कायद्याच्या कलम-८ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पीएसआय एस.एस. किनाके यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड ख्वाजा यांच्या न्यायालयाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी तायडे यास पॉस्को कायद्यानुसार चार वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी तीन महिने शिक्षा, तर ३५४ अ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास, कलम ४४८ अन्वये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाकडून सरकारी विधिज्ञ अ‍ॅड. श्याम खोटरे यांनी कामकाज पाहिले.आरोपी विकृत सवयीचाशिक्षा झालेला आरोपी पुरुषोत्तम तायडे याने हिरपूर येथीलच एक दाम्पत्य झोपलेले असताना त्यांच्या घरात प्रवेश करून विवाहित महिलेचा विनयभंग ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी केला होता. यावरून आरोपीची बुद्धी विकृत असल्याचे न्यायालयाने सांगत आरोपीला ही सवयच असल्याचे स्पष्ट केले. विवाहितेच्या विनयभंग प्रकरणातही आरोपीविरुद्ध ३५४ अ, ४५२, ५०६ नुसार गुन्हा दाखल असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.