शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार असेपर्यंत सरदार पटेल यांच्या मूर्तीपेक्षा उंच मूर्ती होणार नाही - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:17 IST

अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीपेक्षा दुसरी उंच मूर्ती होणार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीपेक्षा दुसरी उंच मूर्ती होणार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर अयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करीत, मुख्यमंत्री रोजच नव्या घोषणा करतात, ते त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात राहत नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या धोरणाविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात यापूर्वी संघर्ष यात्रा काढली आहे, असेही पाटील यांनी सांगितले....तर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव मागण्याची वेळ आली नसती!दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती मुख्यमंत्र्यांना प्रेम असते, तर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्याची वेळ आली नसती, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जागा वाटपावर चर्चा सुरू!आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सध्या राज्यातील जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूकही आघाडी मिळून लढविणार आहे, आघाडीतील मित्र पक्षांसाठी काही जागा सोडण्यात येतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी