शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनसे नेते अमित ठाकरे अकोल्यात, मालोकार कुटूंबियांची घेतली भेट; कुटूंबियांना अश्रू अनावर

By नितिन गव्हाळे | Updated: August 1, 2024 20:27 IST

कुटूंबियांच्याशी पाठीशी असल्याचे ठाकरेंनी केले स्पष्ट

अकोला: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरील मंगळवारी झालेल्या हल्ला प्रकरणात सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे गुरूवार १ ऑगस्ट रोजी अकोल्यात आले होते. त्यांनी निंबी (मालोकार) येथे जाऊन जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेत, त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

अमित ठाकरे यांनी, जय मालोकार यांच्या निधनाचे दु:ख असून, त्यांच्या कुटूंबियांच्या कायम पाठिशी आमचा पक्ष आहे. आपण कोणतही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. यावेळी अजित पवार गट व मनसे मध्ये झालेला राडा व अन्य राजकीय गोष्टींवर काहीही भाष्य करणे अमित ठाकरे यांनी टाळले. याप्रसंगी अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबीयांना आर्थिक मदतही दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकार, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, शहराध्यक्ष सौरभ भगत उपस्थित होते.जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी अमित ठाकरे यांनी कुटुंबियांना दिले. तसेच राज ठाकरे सुद्धा काही दिवसांनी भेट देणार असल्याचंही अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबीयांना सांगितले. यावेळी जय मालोकार यांचे आई वडील, मोठे भाऊ विजय मालोकार उपस्थित होते.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेAkolaअकोला