अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या मनपा प्रशासनाविरोधात आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मंगळवारी तिसर्या दिवशीसुद्धा रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत अभिनव आंदोलन करण्यात आले. भाजप शासनाच्या विकास, प्रगती आणि रोजगाराबाबतच्या ह्यचाय पे चर्चाह्ण या धर्तीवर ह्यखड्डो पे चर्चाह्ण हे उपहासात्मक आंदोलन गोरक्षण मार्गावरील जनता बँकेसमोर राबविण्यात आले. मनसेचे माजी नगरसेवक पंकज साबळे यांच्या नेतृत्वात व महानगर अध्यक्ष सौरभ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या अभिनव आंदोलनात रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. स्वाक्षरींचा गठ्ठा मनपाच्या अधिकार्यांना निवेदनासह सादर करून, त्यांना नागरिकांच्या असंतोषाबाबत अवगत करण्यात येणार असल्याचे यावेळी साबळे यांनी सांगितले. या आंदोलनाप्रसंगी मनविसेचे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले, अरविंद शुक्ला, उपाध्यक्ष राजेश पिंजरकर आदींसह मनसे व मनविसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनसेने घडविली ‘खड्डे पे चर्चा’!
By admin | Updated: July 20, 2016 01:42 IST