शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेरीब्रल पाल्सी आजाराबाबत समाजात गैरसमज - विनिता कदम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:27 IST

सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले.

- संजय खांडेकरअकोला : सेरीब्रल पाल्सी  आजाराबाबत समाजातील सुशिक्षित आणि अज्ञानी दोघांमध्येही अनेक गैरसमज आहे. त्याबाबत जनजागृती आणि तातडीने उपचार झाले, तर सेरीब्रल पाल्सीचे रुग्ण पूर्णपणे चांगले होऊ शकतात. यासाठी रुग्णापेक्षा जास्त काळजी त्यांच्या पाल्यांनी घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. विनिता कदम यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब मिडटाऊनच्यावतीने २८ आणि २९ सप्टेंबर रोजी खंडेलवाल भवनात सेरीब्रल पाल्सीचे शिबिर झाले. विदर्भातील कानाकोपऱ्यातून या शिबिराला प्रतिसाद लाभला. १०८ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याने आयोजकांनाही समाधान लाभले आहे.

प्रश्न : सेरीब्रल पाल्सी हा रोग आनुवंशिक आहे का?उत्तर : सेरीब्रल पाल्सी हा रोग आनुवंशिक नाही. मूल गर्भाशयात असताना त्याला झालेली शारीरिक आणि मानसिक इजा यातून सेरीब्रल पाल्सी रोग उद्भवतो. गर्भवती महिलेच्या मानसिक स्थितीवर हा रोग जास्त अवलंबून आहे. त्याला आनुवंशिक म्हणता येणार नाही; पण जर काही पिढीमध्ये अशी लक्षणे दिसून येत असतील, तर त्यांनी खबरदारी घ्यायला हवी.

प्रश्न : सेरीब्रल पाल्सी रोग होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे?उत्तर : शक्यतोवर जवळच्या नातेवाइकांच्या लग्नसोयरीक करू नये. पुन्हा तेच जिन्स पिढीत आल्याने सेरीब्रल पाल्सी उद्भवू शकतो; मात्र तो आनुवंशिक मुळीच नाही. गर्भावस्थेदरम्यान महिलेची शारीरिक आणि मानसिक काळजी राखली गेली पाहिजे. सोनोग्राफी आणि इतर सर्व चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. एकाच कुटुंबातील एक सदस्य सुदृढ आणि दुसरा सेरीब्रल पाल्सीग्रस्त असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

प्रश्न : सेरीब्रल पाल्सी रुग्णाचे प्रमुख लक्षणे काय?उत्तर : जन्मताच जर मूल रडले नाही, त्याची हालचाल मंद असेल, तर त्या मुलाच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. मूल तीन महिन्यांनंतर शक्यतोवर मान धरते; पण तीन महिन्यांनंतरही मुलाची मान पडत असेल, तर त्या मुलास सेरीब्रल पाल्सी असण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला काही समजत नाही. नंतर अशा रुग्णांमध्ये एकापाठोपाठ एक नवीन लक्षणे असामान्य दिसून येतात, तेव्हा बालरोग तज्ज्ञाकडे दाखविले पाहिजे. जर आई-वडिलांच्या लक्षात ही बाब लवकर आली नाही, तर रोग बढावतो आणि तो आटोक्यात येत नाही.

प्रश्न : सेरीब्रल पाल्सीच्या रुग्णांवर काय उपचार पद्धती आहे?उत्तर : सेरीब्रल पाल्सीचा रुग्ण म्हणजे ब्रेनला झालेली दुखापत. नर्व्हस सिस्टीमशी संबंधित फिजिओथेरपी केली जाते. रुग्णाचा आत्मविश्वास वाढविला जातो. ज्या पेशी कमजोर असतील, त्यांना शक्ती पुरविण्याचे विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. आहारापासून विहारापर्यंत विविध प्रयोग केले जातात. सुरुवातीलाच जर ही बाब लक्षात आली, तर रुग्ण बरा होण्याची शक्यता जास्त असते.

प्रश्न : सेरीब्रल पाल्सीबाबत काय गैरसमज आहे?उत्तर : ज्या कुटुंबीयात सेरीब्रल पाल्सीचा रुग्ण असेल, त्या कुटुंबीयात काही दोष असतील, असे समजणे चुकीचे आहे. मुळात गर्भाची वाढ होत असताना झालेल्या चुकांमुळे हा रोग होतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य