शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कुपोषित बालकांसाठी ‘मिशन झीरो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:41 IST

शिर्ला : पातूर तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात आढळून आलेल्या ३१ कुपोषित बालकांना सक्षम करण्यासाठी ‘मिशन झीरो’ राबविण्याला तहसीलदार डॉ.आर. जी. पुरी यांनी सुरुवात केली आहे. बोडखा डोंगरी गावातील अनिकेत राजेश सरदार आणि ऋतुजा राजेश सरदार २५ महिन्यांच्या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून पातूर आयुर्वेद विशारद डॉ. नितीन शेंडे तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. भास्कर काळे यांनी जबाबदारी स्वीकारली.    

ठळक मुद्देपातूरचे तहसीलदार पुरी यांचा पुढाकार सहा महिन्यांत कुपोषण आणणार शून्यावर!

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात आढळून आलेल्या ३१ कुपोषित बालकांना सक्षम करण्यासाठी ‘मिशन झीरो’ राबविण्याला तहसीलदार डॉ.आर. जी. पुरी यांनी सुरुवात केली आहे. बोडखा डोंगरी गावातील अनिकेत राजेश सरदार आणि ऋतुजा राजेश सरदार २५ महिन्यांच्या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून पातूर आयुर्वेद विशारद डॉ. नितीन शेंडे तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रा. भास्कर काळे यांनी जबाबदारी स्वीकारली.                        पातूर तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांनी थेट बोडखा गाठले. स्वत: वैद्यकीय शास्त्रात पारंगत असल्याने कुपोषित बालकांची तपासणी केली. त्याबरोबरच पातूर तालुका प्रभारी बालविकास अधिकारी समाधान राठोड ह्यांच्याकडून माहिती घेतली.  तालुक्यातील मळसूर येथील तीन, आलेगाव पाच, अंधारसांगवी दोन, चोंढी दोन, झरंडी पाच, या व्यतिरिक्त १२ मुले कुपोषित आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे 

काय आहे मिशन झिरो?पातूर तालुक्यामध्ये असलेल्या कुपोषित बालकांची जबाबदारी समाजकार्य करणार्‍या व्यक्तींकडे विशेषत: डॉक्टरांकडे सोपवण्यात येणार आहे. या व्यक्तींना जबाबदारी दिलेल्या बालकाला सहा महिन्यांत कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची जबाबदारी स्वीकारून तहसीलदार पुरी यांनी कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यांनी कार्यही सुरू केले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना तहसीलच्यावतीने राबवण्यात येणार आहेत. 

बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांचे पद रिक्त मानवी निर्देशांक उंचावण्यासाठी शासनाचा मानव विकास मिशन कार्यक्रम गत दोन वर्षांपासून पातूर तालुक्यात कार्यान्वित आहे. मात्र, देशाच्या उज्‍जवल भविष्य असणारी लहान मुलांची काळजी घेणारी यंत्रणा अव्यवस्थित आहे. वर्षापासून पातूर तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे. त्याबरोबरच पातूर अणि मळसूरची पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. येथील विस्तार समाधान राठोड यांच्याकडे  प्रभार देण्यात आलेला आहे. सदर अधिकार्‍यांचा वेळ शासकीय बैठकांमध्ये खर्च होतो. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

पातूर तालुक्यातील कु पोषित बालके      आगीखेड येथील ऐश्‍वर्या प्रेमसिंग तवर, शिर्ला येथील विरा अनिल दाणे, अनुष्का विशाल खंडारे, शिर्ला पट्टे अमराई येथील मिरर गोपाल चव्हाण, सना निर्दोष राजिक, दुर्गेश उमेश गाडगे, समायरा फिरदोस वसिमोद्दिन, बागायत पातूरचे प्रणव शिवाजी कुकडकर, विनीत दिनेश हिरळकार, दिग्रस बु.चेओम विनायक शेळके, तेजल शिवहरी गवई, तुंलगा खु.चे प्रांजली सुभाष सोनोने, मळसूरचे रुपेश पळसकर, अडगावचे लक्ष्मी राजेश शिरसाट, अडगावचे प्रवीण सुरेश खरात, पांगराचे आरुषी सुनील राठोड, सावरगावचे जयकुमार मनोहर चव्हाण, अंबाशीचे रितेश विजय डांगे, कार्लाचे संदेश कैलास चव्हाण, पिंपळडोळीचे राहुल गजानन खुळे, पाचरणचे प्रथमेश बंडू ससाने, पळसखेडचे श्‍वेता रोहिदास चव्हाण, प्राप्ती रवींद्र जाधव, बाभूळगावचे नयन योगेश खिल्लारे, आस्था गोरखनाथ खिल्लारे, देऊळगावचे असिका मंगेश राऊत, पूर्वी विनायक उपर्वट, भंडारजची आरुषी धर्मदास इंगळे, भानोसचे विष्णू विठ्ठल राठोड, प्राची संदीप चव्हाण आणि बोडख्याचे अनिकेत आणि ऋतुजा राजेश सरदार आदी बालके कुपोषित आहेत.