शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास १0 वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 21:50 IST

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने आरोपीस ठोठावली. 

ठळक मुद्देन्यायालयाने ठोठावली १0 वर्षांची शिक्षा अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने आरोपीस ठोठावली. वाडेगाव येथील रहिवासी एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची आई १५ मार्च २0१६ रोजी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेली होती. त्या सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी घरात दिसली नाही. मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यांची मुलगी वाडेगाव येथीलच रहिवासी प्रदीप देवीदास डोंगरे (२७) याच्यासोबत असल्याची माहिती तिच्या आईला मिळाली. त्यामुळे तिच्या आईने बाळापूर पोलीस ठाण्यात २१ मार्च २0१६ रोजी मुलगी पळविल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी प्रदीप डोंगरे याच्याविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. प्रदीप डोंगरे हा मुलीला घेऊन ३0 मार्च २0१६ रोजी बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना शरण आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीमध्ये ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप डोंगरेविरोधात बलात्कार आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक मनीषा राऊत यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार तपासले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयासमोर आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी प्रदीप डोंगरे यास दहा वर्षांची शिक्षा आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

पीडितेच्या मुलाचे ‘डीएनए’ आरोपीशी जुळलेया अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. यावेळी तिने एका बाळाला जन्म दिला. या बाळाचे आणि आरोपी प्रदीप डोंगरे यांची डीएनए तपासणी केली असता, या दोघांचे एकमेकांसोबत जुळल्याचे निष्पन्न झाले. यावरून या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा हा प्रदीप डोंगरेच असल्याचे सिद्ध झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाAkola Ruralअकोला ग्रामीण