शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त खासगी प्रवासी बसला मिनीट्रकची धडक; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 17:26 IST

अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम नजीक घडली.

कुरूम :  नादुरुस्त खासगी प्रवासी बसला आयशर ट्रकने मागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम नजीकच्या राजस्थानी धाब्या जवळ रविवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.      गंभीर जखमीमध्ये आयशर ट्रकच्या दोन तर किरकोळ जखमीमध्ये ट्रॅव्हल बसच्या व ट्रकच्या प्रत्येकी एका चालकाचा समावेश आहे.      प्राप्त माहितीवरून औरंगाबाद वरून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्र.एम एच २० डी.डी.०७७० या बसचा राजस्थानी धाब्यानजीक समोरचा टायर पंचर झाल्याने रोडवर  उभ्या स्थितीत होती.यावेळी बस चालक व्यंकटेश मनोहर पतंगे वय ३० वर्ष रा.औरंगाबाद हा पंचर बसचा जॅक लावून टायर काढत असतांना याच दरम्यान कानपुर वरून मिरची घेऊन नागपूरला जाणारा आयशर ट्रक क्र.यु पी ७८ एफ ऐन ०६७९ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने  चालवून उभ्या पंचर ट्रॅव्हल बसला जबर धडक दिली. यात आयशर ट्रकचे दोन चालक गंभीर तर एक चालक किरकोळ जखमी झाला. तर पंचर ट्रॅव्हल्स बसचा चालक व्यंकटेश मनोहर पतंगे वय ३० वर्षे हा जॅक बसवितांना टायर घासल्याने जखमी झाला.सुदैवाने बस पंचर असल्यामुळे सर्व प्रवाशी खाली उतरले होते त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच माना पोलीस व कुरूम चौकीचे पोलीस व गृहरक्षक घटनास्थळी दाखल होऊन आयशर ट्रकच्या कॅबिन मध्ये फसलेल्या तीन पैकी दोन गंभीर जखमी चालकांना पोलिसांनी काढून रुग्णवाहिकेने अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर किरकोळ जखमी एका चालकाला व ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला रुग्णवाहिकेने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले.या अपघातात आयशर ट्रकच्या कॅबिनचे व बसच्या मागच्या बाजूला मोठे नुकसान झाले आहे.वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल व्हायचा होता.आयशर ट्रक मधील गंभीर व किरकोळ जखमी चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही.

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात