शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विकास कामांच्या दर्जाबाबत पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:50 IST

अकोला: नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  मंगळवारी सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकास  कामांची पाहणी  केली.  यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत  असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह ठेकेदारांचीही  कानउघाडणी केली. यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, उपविभागीय अभियंता  राम पटोकार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे,   नगरसेवक हरीश अलिमचंदाणी हे उपस्थित होते.

ठळक मुद्देदुचाकीवरून दिवसभर दौरा कामातील अडचणी  दूर करण्यासाठी निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  मंगळवारी सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकास  कामांची पाहणी  केली.  यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत  असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह ठेकेदारांचीही  कानउघाडणी केली. यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, उपविभागीय अभियंता  राम पटोकार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे,   नगरसेवक हरीश अलिमचंदाणी हे उपस्थित होते.अकोल्यात सध्या मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरू असून, या  कामांचा दर्जा चांगला राहावा व सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत  म्हणून पालकमंत्र्यांनी यापूर्वीही अनेकदा निर्देश दिले आहेत. या  निर्देशांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, यासोबत काही  कामांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीमधील वस्तुस्थिती  जाणून घेण्यासाठी पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी सकाळी दहा वाजेपासूनच मोटारसायकलने  पाहणी सुरू केली.  जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अशोक  वाटिका ते सरकारी बगिचा येथील रस्ता, गोरक्षण रोड आदींचा  यात समावेश आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व मानकानुसार  करण्यात येत आहे की नाही, याची पाहणी पालकमंत्र्यांनी केली.  शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार्‍या १५ कोटींच्या  सांस्कृतिक भवनाच्या कामांवर कुठलाही फलक नसल्यामुळे  कामाचा कालवधी, निधी, कधी पूर्ण होणार, ठेकेदार कोण,  याबाबत सामान्य नागरिकांना माहिती कशी मिळणार, अशी  विचारणा करून त्यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. पुढील दोन महिन्यात हे भवन पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. प्र त्यक्षात मात्र कामाची संथ गती पाहून पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात  नाराजी व्यक्त करीत सर्व यंत्रणांना धारेवर धरले. असाच प्रकार  अशोक वाटिका ते सरकारी बगिच्या कार्यालयाच्या पर्यंतच्या रस् त्याबाबत सुरू आहे. कामाचा दर्जा व संथ गतीबद्दल  पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना  धारेवर धरले. कामाच्या ठिकाणी दर्शनी भागावर कामाची किंमत व पूर्ण  करण्याची मुदत तसेच कंत्राटदार आदींची माहिती असावी,  अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. गोरक्षण रोडवरील  बॉटलनेकमुळे सुमारे ४00 मीटरच्या रस्त्यांची कामे  प्रलंबित  आहे, त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.   याबाबत येणार्‍या अडचणींवर लवकरच तोडगा काढण्यात  येईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच तालुका कृषी  अधिकारी  कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री यांची उपस्थिती हो ती. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालय प्रशस्त जागेत शेतकर्‍यांच्या  सोयीच्या दृष्टीने नवीन जागेत स्थलांतरित करण्यात यावे व  कार्यालयीन स्वच्छता याबाबत निर्देश  कृषी अधिकार्‍यांना दिले त.  

सांस्कृतिक सभागृहाचे काम मार्चपर्यंत होणार    क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत जिल्हय़ात क्रीडा संकुल येथे  सर्वांगसुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत  आहे. या ठिकाणी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी भेट  देऊन कामाची पाहणी केली व संबंधित कंत्राटदाराला काम मुद तीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. सदर काम मार्च २0१८  पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे  त्यांनी सांगितले. जिल्हय़ा तील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांना व्यासपीठ  मिळावे यासाठी सांस्कृतिक  सभागृहाचे निर्माण करण्यात आले  आहे. नागरिकांना पुढील वर्षी एक सुसज्ज सभागृह मिळणार  असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  गणेश कुळकर्णी यांची  उपस्थिती होती.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासंबंधी मंत्रालयीन पातळीवर  बैठक घेणार!शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. निवासी   वैद्यकीय वसतिगृह तसेच २१0 खाटांच्या बेड वॉर्डाच्या   बांधकामाची पाहणी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केली.  काम दर्जेदार व्हावे व दिलेल्या निकषाप्रमाणे पूर्ण व्हावे, यासाठी  कंत्राटदार व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्यात.  यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या वसतिगृहाला भेट  देऊन संबंधितांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.  वैद्यकीय अधिकार्‍यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित  अधिकार्‍यांना निर्देश दिलेत. तसेच प्रलंबित कामासाठी  मंत्रालयीन पातळीवर बैठक घेणार असल्याचे सांगितले.  वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अंतर्गत  रस्ते, बगिचा तसेच  विभागाचे दिशा दर्शविणारे फलक तसेच वैद्यकीय  महाविद्यालयाच्या नावाची कमान तयार करण्याचे संबंधित  विभागांना निर्देश दिलेत. परिसरातील स्वच्छता व  साफसफाईसाठी विशेष लक्ष देण्यास यावे, यासंबंधी कंत्राटी   पद्धतीने गरज भासल्यास सफाई कामगार नेमण्यात यावे, अशा  सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या  समस्या तसेच विकास कामाबद्दल मंत्रालयीन स्तरावर बैठक  घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी  वैद्यकीय  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. घोरपडे व  प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख उपस्थित  होते.