शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:23 IST

भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली.

अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारी जिवंत चळवळ आहे. या चळवळीची विचारधारा ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. आपले संविधान हे कुठल्याही जहाल विचारांना स्विकारत नाही. त्यामुळे भाजपा सोबत जातांना आम्हाला भाजपाचा जहाल विचार कधीही मान्य नव्हताच शेतकरी हिताच्या मुद्यावर त्यांना साथ दिली. तीच भूमिका एमआयएम सोबतची राहिल. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी बाबत ६ आॅक्टोबरला चर्चा आहे त्या चर्चेमध्ये भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. कापूस सोयाबीन परिषदांच्या निमित्ताने विदर्भ दौºयावर असलेल्या खा. राजु शेट्टी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाºयांसोबत त्यांनी संवाद साधला.

भाजपा सरकारने शेतकºयांच्या विश्वासघात केला आहे. सध्या सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजपाला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन व्यापक आघाडी निर्माण करावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सध्या चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. अ‍ॅड.आंबेडकर यांची एमआयएम सोबत मैत्री जाहिर झाली आहे. त्याचा कुठलाही परिणाम या चर्चेवर होणार नाही. मुळातच भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी करायची असेल तर सर्वच पक्षांना त्याचे कडवे व जहाल विचार बाजुला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एक त्र यावे लागेल. त्याच दृष्टीने अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर हे उपस्थित होते. महात्मा गांधीचा जप करणारे मोदी हे हिटलरचमहात्मा गांधींचे नाव घेऊन देशभर स्वच्छतेचा जागर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात हिटलरच आहे अशी टीका खा.राजु शेटटी यांनी केली. देशाची वाटचाल सध्या एक पक्षीय अशी होत आहे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असे ज्यांना वाटते त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना