शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पातूरच्या मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करणारा एक जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:54 IST

पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास हल्ला करणार्‍या दोनपैकी एका आरोपीस अटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे. 

ठळक मुद्देदारोकार यांना मारण्याची सुपारी देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास हल्ला करणार्‍या दोनपैकी एका आरोपीस अटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे.  मिलिंद दारोकार हे बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास डीझल भरण्यासाठी जात असताना पेट्रोल पंप व धाब्याच्या कॉर्नरवर पाळत ठेवून असलेल्या सागर संजय इंगळे रा. नानासाहेब नगर पातूर आणि लखन डागोर रा. विजय नगर अकोला यांनी पातूर तहसीलपासून त्यांचा पाठलाग केला आणि मुख्याधिकारी यांची गाडी अडविली. दारोकार यांना गाडीच्या बाहेर काढून लाथा-बुक्क्या आणि दगडाने मारले. दारोकार यांना मारहाण करून दहशत निर्माण करणार्‍या या दोघांच्या तोंडाला कापड बांधलेले होते आणि त्यांच्या मोटारसायकलला कोरी नेमप्लेट होती. या घटनेसंदर्भात सायंकाळी उशिरा पातूर पोलिसांत मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांनी तक्रार दिली. त्यानंतर त्यांना पातूर पोलिसांनी उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून सागर इंगळे याला अटक केली आहे. यातील दुसरा आरोपी लखन डागोर हा अकोल्यातील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना दारोकार यांना मारण्याची सुपारी देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

काम बंद आंदोलनपातूर न.प.चे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १ फेब्रुवारी रोजी सकाळपासून पातूर नगर परिषदेचे कर्मचारी तसेच अखिल भारतीय मजदूर संघटनेच्या कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून व काम बंद आंदोलन केले, तसेच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना पाठविल्या. त्या निवेदनावर नबीखा रहीमखा, दीपक सुरवाडे, गजानन पाटील, प्रमोद घोडे, मो. गाणी उररहमान, विनोद माहुलीकर, ईश्‍वर पेंढारकर, कल्याणी सोळंके, मोनिका वानखडे, ए. एम. व्यवहारे, मदन खोडे, उज्‍जवल भरणे, एस. एस. विराणी, शे. यासीन यांच्यासह इतर कर्मचार्‍यांची स्वाक्षरी आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हाArrestअटक