शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

मध्यान्ह भोजन : विद्यार्थ्यांना उपाशी ठेवल्यानंतरही देयकाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:02 IST

केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : दुष्काळी परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्या, असा आदेश असताना राज्यातील १४६७९ गावांत आहार देण्यातच आला नाही. आता केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या त्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी कंत्राटदारांनी देयकेही सादर केली असून, ती अदा केली जात आहेत.गेल्यावर्षीच्या हंगामात २०१७-१८ मध्ये पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असलेल्या राज्यातील हजारो गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. त्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी आदेश दिला. ठरल्याप्रमाणे असलेल्या उपाययोजना त्या-त्या विभागाने राबविण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एप्रिल ते जून २०१८ या काळात (६७ दिवस) आहार देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांना आहार देण्यासाठी तांदूळ आणि निधीची मागणी करण्याचे पत्र १४ मार्च रोजी दिले. त्यातच मागणीअभावी तांदूळ किंवा निधी न मिळाल्यास विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहतील. त्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचेही बजावले. राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या हजारो टन तांदळाचा दाणाही आॅगस्ट २०१८ पर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पोहोचलेला नव्हता, हे विशेष. १४६७९ गावांतील लाखो विद्यार्थ्यांसाठी आहारच शिजला नाही. ही परिस्थिती असताना त्या सुटीच्या काळात आहार वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटण्याचा प्रकार घडत आहे.

केंद्र शासनाने तांदूळच दिला नव्हता...दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी तांदळाचा पुरवठा केंद्र शासनाकडून भारतीय खाद्य निगममार्फत केला जातो; मात्र तांदूळच मिळाला नव्हता. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी ११२.१६ क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यातून शिजविण्यात आलेल्या आहार पुरवठ्यापोटी कोट्यवधींची देयकेही अदा केली जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या गावांमध्ये आहार वाटप झाला नाही, तेथीलही देयक अदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उन्हाळी सुट्यांत ८३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थितीइयत्ता विद्यार्थीपहिली ते पाचवी ६४७०७सहावी ते आठवी १९१९८ विभागनिहाय दुष्काळी गावेविभाग                            गावांची संख्याअमरावती                       ६५२४नागपूर                           ३२७५औरंगाबाद                      ३५७७कोल्हापूर                           ३०१नाशिक                           १००२

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा