शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक - डॉ. अविनाश सावजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:39 IST

शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.

अकोला: गत काही वर्षांपासून कॅन्सरचा आजार सातत्याने वाढत आहे. त्यासाठी समाजामध्ये जनजागृती आवश्यक आहे. कॅन्सरच्या आजाराशी लढा देण्यात यशस्वी झालेल्या योद्ध्यांच्या अनुभवाद्वारे समाजामध्ये जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.प्रयास सेवांकुर अमरावती व आरंभ संस्था अहमदनगरच्यावतीने अहमदनगर ते अमरावतीदरम्यान कॅन्सर प्रबोधन यात्रेला ४ फेब्रुवारी नगर येथून सुरुवात झाली. ही यात्रा शुक्रवारी अकोल्यात आली होती. त्यावेळी पत्रपरिषदेत ते बोलत होते.समाजामध्ये कॅन्सरच्या आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरंभचे प्रदीप काकडे यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा देणारे गीता पोळ (औरंगाबाद), शरीफ शेख, वैशाली वैराडकर (बुलडाणा) यांना घेऊन ही कॅन्सर प्रबोधन यात्रा काढली आहे. असे सांगत, डॉ. अविनाश सावजी यांनी, कॅन्सरच्या आजारासाठी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, यासाठी यात्रेच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद, जालना, अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटलला भेटी दिल्या. पाच वैद्यकीय महाविद्यालयांनासुद्धा भेट दिली. यासोबतच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. स्तन, मुख आणि शरीराचा कॅन्सर गंभीर विषय आहे. असे त्यांनी सांगितले कॅन्सर योद्धा गीता पोळ यांनी स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतरही त्यातून सकारात्मक विचारातून बाहेर पडले. आता कॅन्सर झालेल्या महिलांना एकत्र करून त्यांना कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रेरित करीत असल्याचे सांगितले. डॉ. सावजी यांनी, कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम दिले तर त्याचा फायदा होईल, असे सांगितले. पत्रपरिषदेला रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. सुनील बिहाडे, डॉ. राजेंद्र मेंडकी, डॉ. दिलीप मानकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :Akolaअकोलाcancerकर्करोगHealthआरोग्य