शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

पुनर्वसित आदिवासींचे जीवन धोक्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 10:43 IST

रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे.

- विजय शिंदे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट तालुक्यात सातपुडा पायथ्याशी असलेल्या आदिवासीबहुल गावातील आदिवासी समाजाच्या समस्या कायम असतानाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदिवासी गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आदिवासी गावात शासनाने पुनर्वसन मोबदला दिला; मात्र काहींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेकांनी त्यांना पुन्हा कंगाल केल्याचे प्रकार घडले, तर वातावरणात झालेल्या बदलांमुळे विविध आजारांमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला. रोजगार, शेती, आरोग्याच्या समस्या आजही कायम असल्याने शासनाचे आदिवासी विकासाचे धोरण अपयशी ठरत आहे.व्याघ्र प्रकल्पातील वनाचे व वन्यजीवांचे व संवर्धन करण्याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची २२ फेब्रुवारी १९७४ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पातील आठ गावांचे पुनर्वसन अकोट उपविभागात करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला १० लाख पुनर्वसन मोबदला दिला. त्यानंतर पुनर्वसित आदिवासींचे पिळवणुकीचे अनेक प्रकार समोर आले.या गंभीर प्रकाराकडे शासनाचे, मानवाधिकार विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष केले आहे. आदिवासीना बँक व कायद्याचे पूर्णत: ज्ञान नाही. पुनर्वसित ग्रामस्थांना दिलेल्या मोबदल्याचे बॉन्ड बँकेत जमा आहेत. या बॉन्डमधून पैसे लागत असतील, तर आधी उपचाराची सर्व कागदपत्रे, अर्ज वन्य जीव विभागाकडे सादर करावे लागतात.उपचाराकरिता पैसे लागत असल्याचे शिफारसपत्र एसडीओंकडे पाठविण्यात येते. गंभीर आजार असल्यास उपचाराकरिता बॉन्ड तोडण्याची परवानगी एसीएफ व एसडीओ देतात; परंतु बहुतांश आदिवासी ग्रामस्थ या किचकट प्रक्रियेपासून अनभिज्ञ असल्याने आदिवासी बांधवांना अडचणी येतात.

२२८ पुनर्वसित आदिवासी गावकऱ्यांचा मृत्यू!आठही आदिवासी गावांमध्ये आरोग्याच्या कारणाने २२८ पुनर्वसित आदिवासी गावकऱ्यांचा आॅगस्ट २०१७ पर्यंत मृत्यू झाला आहे. त्यानंतर विविध कारणांनी मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक आदिवासी बांधवांना हक्काचे पैसे न मिळाल्याने उपचाराविना मृत्यू झाला आहे. त्यांचे पैसे लालफीतशाहीत अडकल्यामुळे या आदिवासींचा बळी गेला. त्यामुळे आदिवासी बांधवामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMelghatमेळघाटforest departmentवनविभाग