शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळात मेगा भरती रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 10:52 IST

महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया गत आठ महिन्यांपासून रखडली आहे. त्यातच महायुतीच्या शासनाने नियुक्त केलेल्या महापरीक्षा पोर्टलने परीक्षेसाठी उमेदवारांना हजारो रुपये शुल्क आकारले. त्यातच संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात मोठे घोटाळे झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या. सत्तांतर झाल्याने आता महापरीक्षा पोर्टल वादात अडकण्याची चिन्हे आहेत.महायुतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती. शासनाच्या सर्वच विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महापरीक्षा पोर्टल या संस्थेकडे काम देण्यात आले. या संस्थेने भरती प्रक्रियेत कमालीचा गोंधळ केल्याच्या तक्रारी गत वर्षभरात झाल्या आहेत.महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला. त्यामुळे ३५ जिल्हा परिषदांतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे उमेदवारांना भाग पाडले. त्यामुळे एकाच पदासाठी ३५ जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करण्याची संधी असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी १७ हजार तर आरक्षित प्रवर्गासाठी १२,५०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेतील रिक्त पदासाठी एकाच दिवशी परीक्षा झाल्यास उमेदवारांना किती ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल, याबाबतची माहितीही महापरीक्षा पोर्टलने कोणत्याही उमेदवाराला दिली नाही. आॅगस्ट २०१९ मध्ये परीक्षा नियोजित असताना महापोर्टलने उमेदवारांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकारही घडले. ती परीक्षा अद्यापही झाली नाही. त्यातच विशेष म्हणजे, एका पदासाठी एकाच दिवशी परीक्षा होणार असताना उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देण्याची संधी आहे. त्यामुळे उमेदवारांकडून केवळ शुल्काची रक्कम वसूल करण्यासाठी पसंतीक्रमाचा पर्याय देण्याऐवजी स्वतंत्र अर्ज करण्याचा अट्टहास महापरीक्षा पोर्टलने केला. त्यामध्ये बेरोजगारांची आर्थिक पिळवणूकच झाली आहे.परभणीतील दलालांकडून ‘सेटिंग’महापरीक्षा पोर्टलमार्फत मेगा भरतीची प्रक्रिया राबविताना घोटाळा करण्याची संधी साधण्यात आली. त्यासाठी परभणी शहरातील काही दलालांनी उमेदवारांशी थेट संपर्क केल्याची माहिती आहे. दोन लाख रुपये टोकन घेऊन १८ ते २० लाख रुपयांत नोकरी देण्याचा सौदाही करण्यात आला.चौकशीत पुढे येईल भरती घोटाळावनरक्षक पदाच्या भरतीमध्ये पुणे, जळगाव जिल्ह्यात गैरप्रकार झाला. त्यात दलालांनी केलेल्या प्रतापाच्या तक्रारी झाल्या. याच पदासाठी औरंगाबादमध्ये शारीरिक चाचणी परीक्षेत अनुपस्थित उमेदवारांना नियुक्तीची शिफारस देण्यात आली.१८०० तलाठी पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत उमेदवारांवर अन्याय झाल्याचे प्रकरण उघड झाले. महापरीक्षा पोर्टलची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होईल, अशा तक्रारीही राज्यात सर्वत्र झालेल्या आहेत. आता जिल्हा परिषदेची पदभरतीही रखडली आहे. ती परीक्षा शासकीय यंत्रणेकडूनच घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार