‘ओबीसींचा लढा व समाज जोडो अभियान’ या उपक्रमाद्वारे क्रांतिज्योती बिग्रेडच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधणी करण्यासाठी समाजातील तरुणांनी पुढे येऊन जनजागृती करावी, प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन ॲड. नंदेश आंबेडकर यांनी यावेळी केले. यावेळी क्रांतिज्योती ब्रिगेडच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये ॲड. नरेंद्र बेलसरे, सुनील भाऊराव अंबळकार, डॉ.राजेंद्र नाथे, नीलेश काळे, विनोद रसे, विजयराव हाडोळे आणि संजय निमकर्डे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला क्रांतिज्योती ब्रिगेडचे नंदकिशोर गोरडे, स्वप्निल इंगळे, अनिल इंगळे, अनिल फुलारी, अशोकराव अंबाडकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शहर आणि ग्रामीण स्तरावर क्रांतिज्योती ब्रिगेडच्या शाखा स्थापन करून संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष ॲड नरेंद्र बेलसरे यांनी केले.
अकोट येथे क्रांतिज्योती ब्रिगेडचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST