शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर उद्या सहकार मंत्र्यांकडे बैठक - पालकमंत्र्यांची ग्वाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:49 IST

अकोला : केंद्र सरकारने गत चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देत, जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर बुधवारी सहकारमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमिवर अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) व संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.विविध योजना व कार्यक्रम राबवून, सरकारने परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : केंद्र सरकारने गत चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देत, जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीच्या मुद्द्यावर बुधवारी सहकारमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी दिली.केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमिवर अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी गत १५ मे पासून बंद करण्यात आली आहे; मात्र आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप बाकी आहे, तसेच खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकºयांना मिळाले नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदी, प्रलंबित चुकारे आणि तूर व हरभरा खरेदीसंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी इत्यादी मुद्द्यांवर बुधवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा उप-निबंधक (सहकारी संस्था ) व संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, सरकारने केलेल्या कामांची माहिती २५ मे ११ जूनपर्यंत जनतेला देण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील पालकमंत्री चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला देणार आहेत, तसेच लाभार्थी आणि बुद्धीजीवींचे संमेलने घेण्यात येणार आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचून सरकारच्या कामांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगत, गत चार वर्षात सरकारने केलेल्या कामांची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, सिंचनावर विशेष भर, शेतकºयांना मदतीसाठी ५० टक्के नुकसान भरपाईचा निकष ३५ टक्क्यांवर आणला असून, महिलांसाठी ३६ आठवड्यांची प्रसूती रजा यांसह शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य विकास अशा विविध योजना व कार्यक्रम राबवून, सरकारने परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, नारायणराव गव्हाणकर, डॉ.अशोक ओळंबे, हरीश आलीमचंदाणी, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अ‍ॅड. मोतीसिंह मोहता, मनोहर हरणे उपस्थित होते.

नेर-धामणा बॅरेजसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प लवकरच होतील पूर्ण!बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत नेर-धामणा बॅरेजसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करीत, नेर-धामणा बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सांगितले. नेर-धामणा बॅरेजच्या कामासाठी ३८ लाखांचा निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा