शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरोग्य उपसंचालकांची परवानगी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 15:56 IST

अकोला: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता नियमित तीन वर्षांची वैद्यकीय सेवा तसेच आरोग्य उपसंचालकांची लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

अकोला: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता नियमित तीन वर्षांची वैद्यकीय सेवा तसेच आरोग्य उपसंचालकांची लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. ही परवानगी प्रवेश परीक्षेला बसण्यापूर्वीच बंधनकारक असणार आहे.राज्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवेत कार्यरत गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. यापूर्वी या अधिकाºयांना केवळ सीईटी परीक्षा उत्तीर्ण गुणांवर प्रवेश मिळायचा; परंतु २०१७ पासून सामाईक परीक्षेऐवजी राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती. यंदा या नियमावलीत आणखी बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रवेश परीक्षेला बसण्यापूर्वीच आरोग्य सेवा परिमंडळाच्या उपसंचालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. उपसंचालकांची परवानगी न घेतल्यास संबंधित सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाºयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कार्यमुक्त करण्यात येणार नसल्याचेही नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती विहित पद्धतीने असणे गरजेचे असून, सेवा कालावधी तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.तर तो अधिकारी प्रवेशास अपात्रनवीन नियमानुसार, वैद्यकीय अधिकाºयांनी मुख्यालयी राहून सेवा देणे आवश्यक आहे. या काळात संबंधित वैद्यकीय अधिकाºयांच्या अनुपस्थितीत गंभीर रुग्णावर उपचार झाले नाहीत, शवविच्छेदन झाले नाही, अशी एकही घटना झाली असल्यास किंवा संबंधित अधिकाºयाविरुद्ध विभागीय चौकशी झाली असल्यास तो अधिकारी प्रवेश परीक्षेसाठी अपात्र ठरणार आहे.दुर्गम भागातील अधिकाºयांना ३० वाढीव गुणांचा लाभसेवांतर्गत वैद्यकीय अधिकाºयांना त्यांच्या अतिदुर्गम, दुर्गम व ग्रामीण भागात केलेल्या सेवेबद्दल वाढीव गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक वर्षासाठी दहा गुण असे जास्तीत जास्त ३० गुण वाढवून दिल्या जातील.पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी अधिकाºयांना परवानगी घेऊनच प्रवेशासाठी अर्ज केला आहे. दुर्गम भागातील अधिकाºयांना ३० गुण वाढीव मिळणार असल्याने, अशा अधिकाºयांना त्याचा फायदा होणार आहे.- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य