शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

वैद्यकीय सीईटी परीक्षा उद्या शहरातील १२ केंद्रांवर होणार परीक्षा

By admin | Updated: May 6, 2014 18:02 IST

अकोला : राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी ही सामाईक परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येत आहे. अकोल्यातील १२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

अकोला : राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी ही सामाईक परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येत आहे. अकोल्यातील १२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. वैद्यकीय सीईटी परीक्षेसाठी अकोला जिल्‘ातून ३ हजार २०७ विद्यार्थी बसणार आहेत. सर्व उमेदवारांना सकाळी ९.१५ वाजता दिलेल्या केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे. सकाळी १० नंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. या परीक्षेसाठी अकोला जिल्‘ासाठी डॉ. नितीन अंभोरे यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अकोला जिल्‘ात जी.एस. कॉन्व्हेंट, माऊंट कारमेल, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, गुरुनानक विद्यालय, सावित्रीबाई फुले जि.प. कन्या शाळा, शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, भिकमचंद खंडेलवाल हायस्कूल हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा केंद्रावर ८ मे रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे. नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी तसेच परीक्षार्थी सोडून इतर कोणत्याही व्यक्तीला परीक्षा केंद्रात प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्रालगत मिरवणूक काढणे मनाई आहे. झेरॉक्स, फॅक्स, मोबाईल फोन, इंटरनेट, सायबर कॅफे, पूल गेम, पेजर, टेलिफोन बुथ, ई-मेल यांचा वापर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आत करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरात ध्वनिक्षेपण करण्यासदेखील मनाई आहे. नियमाचा भंग करण्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी कळविले आहे.