शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांच्या अवैध उत्खननाचे मोजमाप सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:54 IST

अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत गठित पाच पथके २ जून रोजी अकोल्यात दाखल झाली.

अकोला : जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांमधील अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पाच पथकांमार्फत वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप मंगळवारपासून करण्यात आले आहे.जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या संमतीने जिल्ह्यात वाळूघाटांमधील वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आल्याची तक्रार करीत, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी गत ३ मार्च रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यानुसार यासंदर्भात स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचा आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना दिला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या २९ मे रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांच्या ठिकाणी अवैध उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी अमरावती येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे पाच सर्व्हेअर व तलाठ्यांचा समावेश असलेली पाच पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील वाळूघाटांमधील अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत गठित पाच पथके २ जून रोजी अकोल्यात दाखल झाली असून, या पथकामार्फत जिल्ह्यात ११४ वाळूघाटांमधील अवैध उत्खननाचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू