शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 10:05 IST

राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.

ठळक मुद्देसीएए-एनआरसीला विरोध करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना जंतर-मंतरवर आमंत्रित केले होते.मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात मायावती सहभागी झाल्या नाहीत. पुढच्या टप्प्यात त्या सहभागी झाल्या, तर भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-  राजेश शेगोकारअकोला: ‘सीएए’, ‘एनआरसी’ला विरोध करण्यासाठी जंतर-मंतरवर आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन मायावती यांना जाहीरपत्र दिले होते; मात्र मायावतींनी अ‍ॅड. बाळासाहेबांच्या पत्राला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. या आंदोलनाच्या निमित्ताने मायावतींच्या माध्यमातून बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा प्रयत्न मानला जात होता.सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवर वलय आहे. त्यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा प्रयोग केला. भारिप-बहुजन महासंघ या माध्यमातून त्यांनी राजकारणात सोशल इंजिनिअरिंग राबवून त्यांच्या पक्षाला यश मिळवून दिले. गत लोकसभा निवडणुकीत याच भारिप-बमसंचा विस्तार करीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून धनगर, ओबीसींसह मुस्लीम अशी मोट बांधली. या प्रयोगामुळे वैयक्तिकरीत्या अ‍ॅड. आंबेडकर विजयी होऊ शकले नसले तरी त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांची समीकरणे बिघडविली. हे सर्व प्रयोग राबविताना अ‍ॅड. आंबेडकरांनी राष्टÑीय पातळीवर एखाद्या बहुजन नेत्याला सोबत घेण्याची भूमिका यापूर्वी जाहीरपणे घेतल्याचे दिसत नाही. सीएए-एनआरसीला विरोध करण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना जंतर-मंतरवर आमंत्रित केले होते. मायावतींचे उत्तर प्रदेशातील महत्त्व व त्यांचे कार्य याची प्रशंसा करून अ‍ॅड. आंबेडकरांनी त्यांना लिहिलेले पत्र पाहता मायावती यांनी अ‍ॅड.आंबेडकरांना टाळी दिली, तर नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होऊ शकेल, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा होती. मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात मायावती सहभागी झाल्या नाहीत; मात्र पुढच्या टप्प्यात त्या सहभागी झाल्या, तर भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘सीएए’, ‘एनआरसी’च्या माध्यमातून बहुजनांचे अधिकारच संपविण्याची तयारी हे सरकार करीत आहे. त्यामुळे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बहन मायावतींना पत्र लिहून आमंत्रित केले होते. त्या आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत. कदाचित भविष्यात होतील. आंदोलन तीव्र करीत बहुजनांची ताकद वाढविणे, हाच आमचा प्रयत्न आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. आधी देश महत्वाचा.

- राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते वंचित बहूजन आघाडी

 

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरmayawatiमायावतीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी