शेगाव (जि. बुलडाणा) : पहुरपुर्णा येथील २५ वर्षीय विवाहितेने ३ वर्षीय मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या घटनाक्रमात तीचा ३ वर्षाचा मुलगा सुदैवाने वाचला आहे. ही घटना २१ ऑक्टोबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात घडली. तालुक्यातील पहुरपूर्णा येथील शारदा विष्णू ताठे या विवाहितेने आपल्या ३ वर्षीय मुलासह भुसावळकडे जाणार्या रेल्वेगाडीसमोर खंबा क्रमांक ५४६/१५-१६ जवळ उडी घेतली. मात्र सुदैवाने यात ३ वर्षीय मुलगा बचावला. तर शारदाचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्टेशन मास्टर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. महिलेच्या आत्महत्येमागील कारण वृत्त लिहेपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.
मुलासह रेल्वेसमोर उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या
By admin | Updated: October 22, 2015 01:44 IST