अकोला: माहेरावरून २0 लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सिव्हील लाइन पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पतीसह सासू, सासर्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींना लवकरच अटक करणार आहेत. जवाहर नगरातील गोयनका लेआऊटमध्ये राहणारी स्मिता भुषण हलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा विवाह २0१४ मध्ये झाला. तेव्हापासून सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणावरून तिच्यासोबत वाद घालून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. पती भुषण बाबाराव हलवणे, सासरा बाबाराव हलवणे, सासू अरूणा हलवणे यांनी स्मिताकडे माहेराहून २0 लाख रूपये घेऊ ये. तुझ्या वडीलांनी लग्नामध्ये कार दिली नाही. कार आणि पैसे घेऊन आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला. स्मिता माहेराहून पैसे आणत नसल्याने त्यांनी स्मिताचा मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले. शिवीगाळ करणे, मारझोड करणे आणि जीवे मारण्याची धमकी आदी प्रकारही स्मितासोबत सासरच्या मंडळींकडून करण्यात आले. एवढेच नाहीतर तिला तुझ्यापेक्षा सुंदर मुलगी मिळाली असती. असे म्हणून तिचा वारंवार अपमान केला. तिच्या तक्रारीनुसार सिव्हील लाइन पोलिसांनी गुरूवारी रात्री आरोपींविरूद्ध भादंवि कलम ४९८, ३२३, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.
२0 लाख रूपये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: May 1, 2016 01:09 IST