शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest: अकोला येथे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या

By atul.jaiswal | Updated: August 5, 2018 15:18 IST

अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. डॉ. रणजीत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाप्रतीची सरकारची भूमिका विषद केली. यावेळी त्यांनी आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री (शहरे) तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, डॉ. पाटील यांनी आंदोलकांना सामोरे जाताना सरकार मराठा आरक्षणासाठी अनुकुल असल्याचा शब्द दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात धुमसत आहे. गोदावरीत काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात आंदोलनाने पेट घेतल्याचे दिसून आले. २५ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचे चित्र होते. बंददरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्हा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने त्यांचा रोख जिल्ह्यातील मराठा समाजाचे खासदार, मंत्री, आमदार यांच्याकडे वळविला आहे. समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यासाठी क्रांती मोर्चा आग्रही आहे. त्यानूषंगाने १ आॅगस्ट रोजी खासदार व आमदारांच्या घरासमोर आंदोलन केल्यानंतर शनिवार, ५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘असा कसा देत नाही- घेतल्या शिवाय राहत नाही’, ‘तुमचे आमचे नाते काय- जय जिजाऊ जय शिवराय’, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर डॉ. रणजीत पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांनी मराठा आरक्षणाप्रतीची सरकारची भूमिका विषद केली. यावेळी त्यांनी आंदोलकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.गृहराज्यमंत्र्यांनी घेतला बेसन-भाकरीचा आस्वादपालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या देणाऱ्या मराठा समाज आंदोलकांनी दुपारच्यावेळी सोबत आणलेल्या बेसन-भाकरीच्या शिदोºया सोडल्या. यावेळी आंदोलकांनी डॉ. रणजीत पाटील यांनाही बेसण-भाकर खाण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देत डॉ. पाटील यांनी आंदोलकांमध्ये बसून त्यांच्यासोबत बेसन-भाकर खाल्ली.

टॅग्स :AkolaअकोलाMaratha Reservationमराठा आरक्षणDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील