अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना मिळाला रोजगार

By Atul.jaiswal | Published: November 15, 2017 01:08 PM2017-11-15T13:08:30+5:302017-11-15T13:12:37+5:30

Many youth got employment from 18 employment gathering in Akola district | अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना मिळाला रोजगार

अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना मिळाला रोजगार

googlenewsNext
ठळक मुद्देकौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचा उपक्रम जिल्हापातळीवर रोजगार निर्मिती

अकोला: महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्वप्न अनेक
युवक युवती आपल्या उराशी बाळगतात. बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून राज्यशासनाच्या वतीने जिल्हा पातळीवर रोजगार निर्मिती उपलब्ध केले आहे. अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळावे झाले असून, त्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.
स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विभागीय स्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर चार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते.
योग्य अभ्यासक्रम, शिक्षण आणि प्रशिक्षीत शिक्षकांवर यात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये उद्योजक व नोकरी उत्सुक उमेदवारांना एका छताखाली आणून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ विनामुल्य उपलब्ध करुन देणे व नोकरी उत्सुक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्यात येते. यासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. योग्य प्रशिक्षण व पसंतीशिवाय स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही.परंतु या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन युवकांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी सेवा देण्याची, उत्कृष्ट प्रशिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होते. समाजात स्वयंरोजगाराबाबत अनुकुल बदल व राष्ट्राचा विकास कौशल्ययुक्त प्रशिक्षणातुनच शक्य आहे.

अमरावती विभागात ९६ रोजगार मेळावे
अमरावती विभागात अमरावती २९, अकोला १८, बुलडाणा १७, यवतमाळ १९ व वाशिम १३ अशा ९६ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत वीस हजार युवकांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.

Web Title: Many youth got employment from 18 employment gathering in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी