शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष देऊन अनेकांना लाखो रुपयांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 10:31 IST

Crime News पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

अकोला : शहरातील एका व्यक्तीने व्यापारी व उद्योजकांना पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आणखी काही तक्रारकर्ते पोलिसांकडे तक्रार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.अकोल्यातील रहिवासी देवेंद्र गोपाल अग्रवाल याने पुण्यातील स्पार्क रियालिटी या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात असलेल्या सुमित नामक व्यक्तीच्या साहाय्याने अकोल्यातील अनेकांना पुणे येथे फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. दर महिन्याला एक किस्त भरून तीन वर्षांत तो फ्लॅट देण्याचेही आमिष या दोघांनी दाखविले. शहरातील डॉक्टर, वकील, अभियंते तसेच उच्च प्रतिष्ठित नागरिकांना त्याने पुण्यातील फ्लॅटची भुरळ पाडली. ज्या व्यक्तींनी तीन वर्षे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना फ्लॅटची गरज नसेल तर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष या दोघांनी अकोलेकरांना दाखविले. त्यामुळे या आमिषाला अनेक जण बळी पडले असून काहींनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची तक्रार डॉक्टर वाघेला पिता-पुत्रांनी केली असून यासह तब्बल दहा ते बारा जण तक्रार करण्याच्या मनस्थितीत आहेत. पुण्यातील फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविणाऱ्या या दोघांनी खडकी परिसरातही अनेकांना अशाच प्रकारे गंडविले याची माहिती समोर आली असून या ठिकाणीही फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना लाखो रुपयांनी चुना लावल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी