शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मंगेश बुंदे यांची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:06 IST

मंगेश बुंदे असे युवकाचे नाव असून, त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

अकोला: बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा येथे एका इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास करताना वाशिम जिल्ह्यातील कोंढाळा येथील रहिवासी मंगेश बुंदे असे युवकाचे नाव असून, त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हत्या करणाऱ्या गजानन भाकरे याला अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.रिधोरा परिसरात २५ डिसेंबरच्या पहाटे एका नाल्यात एका इसमाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला. सदरचा मृतदेह हा वाशिम जिल्ह्यातील कोंढाळा येथील मंगेश सुभाष बुंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उत्तरीय तपासणीमध्ये या इसमाची गळा आवळून हत्या झाल्याच्या प्राथमिक माहितीवरून त्यांनी व्याळा येथील रहिवासी गजानन ऊर्फ बबलू लक्ष्मण भाकरे याला मंगळवारी अटक केली. त्यानंतर आरोपीस बाळापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी संशयावरून तसेच एका ओळखपत्रावरून ही हत्या व्याळा येथील गजानन भाकरे याने केल्याचे समोर आले. त्यानंतर संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ तसेच त्यांच्या पथकाने कसून तपास केल्यानंतर त्याला अटक केली. त्यानंतर बाळापूर न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर आरोपीला बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी