अकोला: तोष्णीवाल लेआऊट परिसरात व्यापार्याला लुटल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी पुन्हा महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकल्याची घटना सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास रामनगरात घडली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामनगरात राहणार्या प्रतिभा रामचंद्र अग्रवाल (५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घरातील उरलेले अन्न परिसरातील एका चौकीदाराला देऊन परतत असताना, मोटारसायकलवर दोन युवक त्यांच्या मागे आले आणि त्यांना आवाज देऊन, मावशी गोरक्षण रोड कुठे आहे, असे विचारले. प्रतिभा अग्रवाल या मागे वळताच, या युवकांनी त्यांच्या गळय़ातील १५ ग्रॅमचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. या मंगळसूत्राची किंमत ३0 हजार रुपये आहे. मंगळसूत्र हिसकल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला.
महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र हिसकले
By admin | Updated: November 15, 2014 00:27 IST