शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

तरुणीवर प्राणघातक हल्ला करून इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 4:07 PM

खेट्री (जि. अकोला) :  १८ वर्षीय युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून ५० वर्षीय इसमाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील विवरा शेतशिवारात  १९ नोव्हेंबर रोजी घडली.

विवरा शेतशिवारातील घटना : तरुणी गंभीर जखमी

खेट्री (जि. अकोला) :  १८ वर्षीय युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून ५० वर्षीय इसमाने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील विवरा शेतशिवारात  १९ नोव्हेंबर रोजी घडली. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी मृताविरुद्ध युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या विवरा येथील १८ वर्षीय तरुणी आई व बहिणीसोबत सोमवारी कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी  खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील नियामत खा सुजात खा (५०)हा तेथे पोहोचला. यावेळी त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणीवर सपासप वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी होऊन खाली पडली. हल्ला केल्यानंतर नियामत खा हा पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारच्या शेतातील लोकांनी आरडाओरड करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिथरलेल्या नियामत खा याने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे; तसेच तरुणीवर हल्ला केल्याप्रकरणी नियामत खा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी .सी. खंडेराव, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, उप-निरीक्षक जयसिंग पाटील व बाळापूरचे उप-विभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.  

हद्दीच्या वादातून प्रेत पाच तास होते पडून विवरा शेतशिवारात हा थरार घडल्यानंतर चान्नी आणि पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली; मात्र घटनास्थळ कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, हे निश्चित झाले नाही. त्यामुळे घटना घडल्यानंतर मृतदेह पाच तास घटनास्थळावरच पडून होता. अखेर हे घटनास्थळ चान्नी पोलिसांच्या हद्दीत असल्याचे निश्चित झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आला. 

 

आतापर्यंत केलेल्या चौकशीनुसार, याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तसेच तपासात पुढे ज्या बाबी समोर येतील त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. - सोहेल शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर.  

 

याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे, तसेच मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मृतावर भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - प्रकाश झोडगे, ठाणेदार, चान्नी. 

माझ्या भावाने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाली आहे. याप्रकरणी हत्या झाल्याची तक्रार चान्नी पोलिसात २० नोव्हेंबर रोजी देऊ, तसेच पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याची गरज आहे. - सरदार खा सुजात खा, मृताचा भाऊ . 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून