शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथील इसमाची अकोल्यात दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:33 IST

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात भंडारा येथील रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षीय इसमाची पेचकच भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात भंडारा येथील रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षीय इसमाची पेचकच भोसकून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ही हत्या नात्यातीलच एका युवकाने केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू केली आहे.जुने शहरातील रहिवासी सागर चौधरी याने भंडारा येथील रहिवासी असलेल्या संतोष पांडुरंग ठाकरे (४५) यास गुरुवारी दुपारी रेल्वे स्टेशनवरून स्वत:च्या दुचाकीने जुने शहरात आणले. त्यानंतर या दोघांनी शहरात नास्ता व चहापाणी घेऊन सायंकाळच्या सुमारास हे दोघेही अन्नपूर्णा माता मंदिरामागील जंगलात बसले. या ठिकाणी दोघांमध्ये बराच वेळ वाद झाल्यानंतर सागर चौधरीने संतोष ठाकरे यांच्या पोटात पेचकच भोसकला. त्यानंतर लगेच परिसरातील दगड ठाकरेच्या डोक्यात घातला. दगडाने चार ते पाच वेळा ठाकरेंच्या तोंडावर आणि दगडावर हल्ला केल्याने यामध्ये ठाक रेचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्यासह जुने शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. पोलिसांनी संतोष ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून, घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी करून फॉरेन्सिक व्हॅनद्वारे घटनास्थळाची तपासणी करण्यात आली आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे बोलल्या जात असून, पोलिसांनीही या अनैतिक संबंधाच्या कारणाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर चौधरी याला ताब्यात घेतल्यानंतर मृतक व आरोपींमध्ये नाते असल्याचीही माहिती समोर आली आहे. आठवड्यात दोन हत्याशहरात एका आठवड्यात दोन हत्याकांड घडले आहेत. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच लहान उमरीत एका युवकाची धुळवडीला हत्या करण्यात आली, तर लगेच एका आठवड्याच्या आतच भंडारा येथील इसमाची अकोल्यात हत्या करण्यात आली. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून, निवडणूक कामासोबतच गुन्हेगारीवर नियंत्रणासाठीही पोलिसांना काम करावे लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी