शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 14:41 IST

अकोला : पती व सासू-सासरे यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या आरोपातून पती, सासू व सासरा यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश (चौथे) दि.भा. पतंगे यांच्या न्यायालयाने शनिवारी निर्दोष सुटका केली.

अकोला : पती व सासू-सासरे यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या आरोपातून पती, सासू व सासरा यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश (चौथे) दि.भा. पतंगे यांच्या न्यायालयाने शनिवारी निर्दोष सुटका केली. अरविंद डिगांबर शेगोकार (पती), डिगांबर शेगोकार (सासरा) व रत्नप्रभा शेगोकार (सासू) ही सुटका झालेल्यांची नावे आहेत.सरस्वती हिचा विवाह अरविंद शेगोकार यांच्यासोबत १४ एप्रिल २००८ रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता. त्यानंतर सरस्वती व अरविंद यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. आठ वर्षांनंतर ८ मे २०१६ रोजी सरस्वती यांनी त्यांच्या घरात नाटेला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सरस्वती यांचे वडील गजानन घाटोळ यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अरविंद डिगांबर शेगोकार (पती), डिगांबर शेगोकार (सासरा) व रत्नप्रभा शेगोकार (सासू) यांनी संगनमत करून सरस्वतीला स्वयंपाक येत नाही, कामधंदा येत नाही असे म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते व मारहाण करून तिचा छळ करीत होते. मारहाणीला कंटाळून मुलीने आत्महत्या केली व तिच्या मरणास आरोपी कारणीभूत आहेत, अशी तक्रार चान्नी पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०६, ४९८ अ, ३४ नुसार पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने सरस्वती यांचे वडील गजानन घाटोळ, भाऊ तुषार घाटोळ, पोलीस पाटील नितीन गवई व तपास अधिकारी चंद्रकांत ममताबादे असे पाच साक्षीदार तपासले; मात्र सरकार पक्ष सबळ पुरावा न्यायालयात दाखल करू शकला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून तिन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. अनिल पाटील यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी