शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण नाट्य स्पर्धा : अकोला परिमंडळाच्या ‘बाबा मी तुमचीच’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:40 IST

अकोला: नागपूर येथे पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम क्रमांक पटकाविला.

अकोला: नागपूर येथे पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम क्रमांक पटकाविला. अमरावती परिमंडलाचे ‘ती रात्र’ हे नाटक उपविजेते ठरले. ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात दोन दिवस चाललेल्या या नाट्य स्पर्धेत चंद्र्रपूर परिमंडलातर्फे अशोक बुरबुरे लिखित ‘आग्टं’, अमरावती परिमंडलातर्फे हेमंत एदलाबादकर लिखित ‘ती रात्र’, गोंदिया परिमंडलातर्फे प्रशांत दळवी लिखित‘चारचौघी’, अकोला परिमंडलातर्फे चंद्र्रकांत शिंदे लिखित ‘बाबा मी तुमचीच मुलगी आहे’ तर, नागपूर परिमंडलातर्फे दिपेश सावंत लिखित ‘ओय लेले’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी मंचावर महावितरणचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नाट्य स्पर्धेचे कार्याध्यक्ष तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर, अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे, उपव्यवस्थापक गुरुमितसिंग गोसल, जनसंपर्क अधिकारी विकास आडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन किशोर गलांडे यांनी, तर आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले. अकोला परिमंडळातील नितीन नांदुरकर, गणेश राणे, नूतन दाभाडे, ज्योती मुळे, संतोष पाटील यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.कर्तबगार कर्मचाऱ्यांचा सत्कारआपल्या कार्यालयीन कामात विशेष योगदान दिलेल्या खामगाव येथे कार्यरत सहायक अभियंता शैलेश आकरे, कामठी येथील उपकार्यकारी अभियंता दिलीप मदने आणि वर्धा शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ मधू शिव या कर्मचाºयांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळcultureसांस्कृतिक