शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:03 IST

सट्टाबाजाराच्या दृष्टीने अकोला शहरातील दोन्ही भाजपचे उमेदवार सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार २१ आॅक्टोबर २०१९ रोजी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी कमी असल्याने प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांचे कार्यकर्ते मतांची गोळाबेरीज करण्यात लागले आहे. याच अंदाजावर जिल्ह्यातील सटोडियांनी राजकीय सट्टाबाजार गरम केला असून, कोट्यवधीची खायवाडी सुरू आहे. मंगळवारी चाललेल्या सट्टाबाजारात अकोला पश्चिमचे भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांचे भाव ५ ते ७ पैसे असून, अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांचे भाव ७ ते १० पैसे चालले. त्यामुळे सट्टाबाजाराच्या दृष्टीने अकोला शहरातील दोन्ही भाजपचे उमेदवार सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.अकोला जिल्ह्यातील सर्वात चुरशीची लढत झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. सोमवारी रात्री भाजपच्या गोवर्धन शर्मा यांचे भाव ५० पैसे तर काँग्रेसच्या साजिद खानचे भाव ७० पैसे होते. मंगळवारी हे भाव पुन्हा घसरून ५ ते ७ पैशांवर येऊन ठेपले. मदन भरगड यांचे भाव मात्र दीड रुपयांच्या खाली आले नाही.अकोला पूर्वमध्येही काट्याची लढत दाखविली जात आहे. भाजपच्या रणधीर सावरकरांचे भाव सोमवारी ५० पैसे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वंचितच्या हरिदास भदे यांचे भाव ८० पैसे होते. मंगळवारी मात्र सावरकरांचे भाव ७ ते १० पैशांवर स्थिर झाले. काँग्रेसचे उमेदवार विवेक पारसकर यांचे भाव साडेतीन रुपयांवरून खाली सरकले नाही.अकोट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांचे भाव ९० पैसे असून, प्रहारचे तुषार पुंडकर १ रुपयांवर आहे. याच स्पर्धेत काँग्रेसचे संजय बोडखे असून, त्यांचे भाव १.१० रुपयांवर स्थिर आहे.सट्टाबाजाराच्या दृष्टीने भारसाकळे, पुंडकर आणि बोडखे मागे-पुढे आहेत. बाळापूरमध्ये वंचितचे उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचे भाव ५५ पैसे असून, शिवसेनेच्या नितीन देशमुख यांचे भाव ६० पैसे आहे. त्यांचे पाठोपाठ एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान यांचे भाव सट्टाबाजारात सुरू आहे.मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंपळेंचे भाव ९० पैसे आहे. तर वंचितच्या प्रतिभा अवचार आणि राष्ट्रवादीचे रवी राठी यांचे भावदेखील १ रुपयाच्या घरात आहे. मूर्तिजापुरातील लढतीत सटोडियेदेखील संभ्रमात आहेत. त्यांचे गणित येथे बिघडण्याची शक्यत वर्तविली जात आहे.सटोडिया बाजारातील कमीत-कमी भाव उमेदवाराच्या विजयाचे संकेत असतात. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील चित्र सटोडिया बाजारातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, २४ आॅक्टोबर रोजी यातील अंदाज किती खरे ठरतात, याकडे अकोलेकरांचे आणि राजकारण्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akola-west-acअकोला पश्चिमakola-east-acअकोला पूर्वGovardhan Sharmaगोवर्धन शर्माRandhir Savarkarरणधीर सावरकर