शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बाळापूरात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:46 IST

अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.

-नितीन गव्हाळे

 अकोला: बाळापूर काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्याने, येथून काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांनी लढण्याची तयारी केली होती; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम गावंडे यांच्यासाठी बाळापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे बाळापूर मतदारसंघाबाबत तिढा निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला बहाल केल्याने, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसचे प्रकाश तायडे यांनी गुरुवारी अर्ज भरल्याने येथे बंडखोरीची शक्यता आहे..बाळापूर मतदारसंघ १९६१ ते १९८५ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. १९९0 मध्ये प्रथमच भाजप येथून विजयी झाली. त्यानंतर लक्ष्मणराव तायडे यांनी पुन्हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. भाजपचे नारायणराव गव्हाणकर यांनीसुद्धा येथून बाजी मारली होती. लक्ष्मणराव तायडे, गव्हाणकर, सिरस्कार यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरण जुळवून विजय खेचून आणण्याच्या इराद्याने काँग्रेस ताकदीने मैदानात उतरली होती. या मतदारसंघात मुस्लीम, माळी समाजाची निर्णायक मते असल्यामुळे प्रकाश तायडे, नातिकोद्दीन खतिब येथून उमेदवारी आग्रही होते. या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले होते. वंचित बहुजन आघाडी, सेना-भाजप युतीच्या उमेदवारांचेसुद्धा काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. परंतु बुधवारी उशिरा रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना उमेदवारी जाहिर झाल्याने काँग्रेसला या मतदारासंघावरच पाणी सोडावे लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रकाश तायडे यांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तायडे यांनी दोन वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी केली होती. गावोगावी सभा घेऊन त्यांनी संपर्क सुरू केला होता; परंतु आघाडीत ही जागा राकाँला गेल्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. आता काँग्रेस आघाडी धर्म पाळते की आणखी बंडखोरीची भूमिका घेते. हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

संग्राम गावंडे यांना काढावी लागेल समजूतबाळापूर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संग्राम गावंडे यांना ही जागा सोडल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसची ही नाराजी संग्राम गावंडे यांच्यासाठी लाभाची नाही. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, नेते, पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यांची समजूत काढावी लागणार आहे.

 

टॅग्स :balapur-acबालापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAkolaअकोला