लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, केंद्र सरकारचे कोलमडलेले आर्थिक नियोजन, असुरक्षितता यासह अन्य मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पश्चिम वºहाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पश्चिम वºहाडात सर्वाधिक प्रभाव आहे. शुक्रवारी सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बंदसाठी रस्त्यावर उतरले होते. परिणामी, पहाटेपासूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. बंदसाठी कार्यकर्त्यांनी आधीच विविध संघटना व संस्थांना सहकार्याचे आवाहन केले होते. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. अनेक शाळाही बंद होत्या तसेच सरकारी कार्यालयातील उपस्थितीही तुरळक होती. दुपारी ४ नंतर बंद मागे घेण्यात आल्यावर काही प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने सुरू झाली.
Maharashtra Bandh : पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:49 IST
वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पश्चिम वºहाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Maharashtra Bandh : पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद
ठळक मुद्दे अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.बंदसाठी कार्यकर्त्यांनी आधीच विविध संघटना व संस्थांना सहकार्याचे आवाहन केले होते.दुपारी ४ नंतर बंद मागे घेण्यात आल्यावर काही प्रमाणात व्यापारी प्रतिष्ठाने सुरू झाली.