शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीत भरला रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:30 IST

जातीय समीकरण, कोण निवडून येणार, या गप्पाही पारावर रंगल्या आहेत.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा निवडणुकीत तिंरगी लढतीचे चित्र असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत असून, निवडणुकीच्या दुसऱ्या चरणात आता चांगलाच रंग भरला आहे. गावागावात उमेदवारांच्या प्रचाराचे भोंग वाजू लागले आहेत. जातीय समीकरण, कोण निवडून येणार, या गप्पाही पारावर रंगल्या आहेत.मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांनी वेगवेगळी निवडणूक लढली होती ; तथापि मागच्या निवडणुकीचा अनुभव बघता, या चारही राजकीय पक्षांनी महायुती, महाआघाडी केली. यामुळे या निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून, कोण निवडून येणार, हे सांगणे कठीण असल्याची गावागावातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.जातीय समीकरणावर चांगल्याच गप्पा रंगत असून, आमचाच उमेदवार निवडून येईल, असे भाकीत वर्तविण्यात येत आहे.अकोला जिल्हा कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक जिल्हा आहे. अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघ सोडले तर उर्वरित मतदारसंघ ग्रामीण भागात मोडतात. असे असले तरी अकोला पूर्व व पश्चिम मतदारसंघात मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्यास आलेल्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अकोला पश्चिममध्ये पाच वेळा निवडणूक रिंगणात बाजी मारणारे गोवर्धन शर्मा सहाव्यांदा नशीब आजमावित आहेत. अकोला शहरात हिंदी भाषिक मतदारांचाही प्रभाव आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून मदन भरगड, काँग्रेसतर्फे साजिद खान पठाण हे तीनही हिंदी भाषिक उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे हिंदी भाषिक मतदार कुठे जातात, यावर चर्चा होत असून, त्यावरच यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराचे भाग्य ठरणार असल्याचे विश्लेषक सांगतात. अकोला पूर्व मतदारसंघातही अशीच लढत आहे. येथे तीनही मराठी भाषिक उमेदवार रिंगणात आहेत. यात एका उमेदवाराने दोनदा, तर एकाने मागील पाच वर्ष आमदार म्हणून कार्यकाळ उपभोगला. या मतदारसंघात काँग्रेसतर्फे विवेक पारसकर रिंगणात आहेत. त्यांची पाटी कोरी आहे. या मतदारसंघातील मतदार फारच चोखंदळ आहे. १९५२ च्या निवडणुकीपासून हरिभाऊ भदे सोडले तर या मतदारसंघाने दुसºयांदा कोणालाच संधी दिली नाही. यावेळी रणधीर सावरकर दुसºयांदा नशीब आजमावित आहेत. बाळापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांच्यासमोर एमआएएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान यांनी आव्हान उभे केले आहे. येथे काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे रिंगणात आहेत. ते प्रथमच या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तरुण व धावपळ करणारा युवक म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे नितीन देशमुख दुसºयांदा रिंगणात उतरले आहेत. या प्रमुख राजकीय पक्षासोबतच स्वाभिमानी पक्षाचे तुकाराम दुधे रिंगणात आहेत. या मतदारसंघातही दुसºया चरणात तर्क काढणे कठीण असले तरी गावागावात आमचाच उमेदवार निवडून येईल, या गप्पा रंगल्या आहेत.अकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेनेचे उमेदवार प्रकाश भारसाकळे दुसºयांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या कार्यकाळात या भागात बरीच विकासाची कामे झाल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे. या मतदारसंघात यावेळी काँग्रेसतर्फे प्रा. संजय बोडखे रिंगणात आहेत, तर वंचित बहुजन आघाडी, प्रहार व इतर अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019