‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे मिळणार ‘महाबीज’चे अनुदानावरील हरभरा बियाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:10 AM2020-10-11T11:10:16+5:302020-10-11T11:10:29+5:30

Mahabeej, Agriculture, Akola राज्यात ६५ हजार क्विंटल हरभºयाचे बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.

'Mahabeej' subsidized gram seeds will be available through 'Mobile App'! | ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे मिळणार ‘महाबीज’चे अनुदानावरील हरभरा बियाणे!

‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे मिळणार ‘महाबीज’चे अनुदानावरील हरभरा बियाणे!

googlenewsNext

- संतोष येलकर

अकोला: यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत (महाबीज) शेतकऱ्यांना ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे अनुदानावरील हरभरा बियाणे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात ६५ हजार क्विंटल हरभºयाचे बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून, अनुदानावरील हरभरा बियाणे ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे वाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प महाबीजकडून पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.
शासनाच्या अनुदानावरील बियाणे वाटप योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर हरभरा बियाणे वाटप करण्यासाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत शेतकºयांना परमीटचे वाटप करण्यात येते. कृषी विभागाने दिलेल्या परमीटवर बियाणे विक्रेत्यांकडून शेतकºयांना अनुदानावर महाबीजचे बियाणे वाटप करण्यात येत होते. यावर्षीच्या रब्बी हंगामात मात्र अनुदानावरील महाबीजचे हरभरा बियाणे घेण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाच्या ‘परमीट’ची गरज भासणार नाही. राज्यातील शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे मोबाइल अ‍ॅपद्वारे वितरित करण्यासाठी ‘महाबीज’ने बियाणे विक्रेत्यांकडे ‘मोबाइल अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या ‘अ‍ॅप’द्वारे शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकºयांना अनुदानावर ६५ हजार क्विंटल हरभरा बियाणे वाटप करण्याचे नियोजन महाबीजने नियोजन केले असून, रब्बी हंगामात मोबाइल अ‍ॅपद्वारे अनुदानावरील बियाणे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प यावर्षी पहिल्यांदाच ‘महाबीज’कडून राबविण्यात येत आहे.

शेतकºयांना द्यावा लागेल सात-बारा, आधार क्रमांक!
शेतकºयांना मोबाइल अ‍ॅपद्वारे अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकºयांना सात-बारा व आधार क्रमांकाची झेरॉक्स संबंधित बियाणे विक्रेत्यास द्यावी लागणार आहे. सात-बारा व आधार क्रमांकाची झेरॉक्स दिल्यानंतर विक्रेत्याकडून शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे वितरित होणार आहे.

यावर्षीच्या रब्बी हंगामात राज्यातील शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे मोबाइल अ‍ॅपद्वारे वाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प ‘महाबीज’कडून राबविण्यात येत असून, मोबाइल अ‍ॅपद्वारे बियाणे वाटप सुरू करण्यात आले आहे. राज्यात अनुदानावर ६५ हजार क्विंटल हरभरा बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
- अजय कुचे
महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

 

Web Title: 'Mahabeej' subsidized gram seeds will be available through 'Mobile App'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.