यामध्ये सर्वोत्कृष्ट देगाव येथील सरपंचांना देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकूल मालवाडा येथील लाभार्थी आशिष सुभाष बेदरे, अंदुरा येथील राजेश सुखदेव चोरडे, व्याळ्याचे सुनील अनिल खारोडे, खामखेडचे रामकृष्ण साबळे यांना मिळाले. महा-आवास अभियान दि. २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ पर्यंत होते. कार्यक्रमास गटविकास अधिकारी अक्षय सुर्के, सहायक गट विकास अधिकारी अरुण मुंदडा, विस्तार अधिकारी डी. के. देशमुख, नाकट, महल्ले, सुनीता इंगळे, पं. स. गटनेते योगेश्वर वानखडे, अनिरुद्ध देशमुख, बाळू हिरेकर, बाळासाहेब लांडे, सुभाष धनोकार, ज्ञानेश्वर म्हैसने, माजी न. प. उपाध्यक्ष करणसिंह ठाकूर, शहरप्रमुख आनंद बनचरे, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
महा-आवास अभियान : तालुका स्तरावरील सर्वोत्तम पुरस्काराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST