शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 14:12 IST

अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्दे शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. शिक्षण विभागाकडून कारवाईचा इशारा, कारवाई मात्र शून्य.झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नावापुरता प्रवेश घेऊन शिकवणी वर्गांना महत्त्व देतात. कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा प्रवेश क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तुम्ही केवळ प्रवेश घ्या, उपस्थितीचे आम्ही पाहू, असे सांगत होते. त्यामुळे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना वर्षभर दांडी मारतात आणि परीक्षेच्या तोंडावर केवळ प्रॅक्टिकलपुरते उगवतात. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. ही बाब माध्यमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याबाबत बजावले होते. कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती नसल्यास त्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, असा इशारा दिला होता आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीची झाडाझडती शिक्षण विभागाने घेण्यास सुरुवात केली खरी; परंतु झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभाग नेहमीच विद्यार्थी नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देतो; परंतु पुढे एकाही महाविद्यालयावर शिक्षण विभाग कारवाई करण्याची धमक दाखवित नाही. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांचे चांगलेच फावत आहे. शिक्षण विभाग केवळ इशारा देतो; परंतु कारवाई करीत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा निश्चिंत असतात. त्यामुळे आतातरी शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थी उपस्थित राहतात की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पथक नेमले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना उपस्थिती दिसणार नाही, त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,माध्यमिक विभाग.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक