सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील छावणी (धाबा) येथील रहिवासी प्रेमी युगलाने झाडाला एकाच नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १२ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली.उमेश प्रसराम चव्हाण (३५) व प्रियंका विजय चव्हाण (१८)असे मृतकांची नावे आहेत.उमेश प्रसराम चव्हाण (३५) हा विवाहित असून त्याला पत्नी व दोन चिमुकले मुले आहेत तर मृतक प्रियंका विजय चव्हाण (१८) हिने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. दोघेहे ११ एप्रिलच्या रात्रीपासून घरून बेपत्ता होते. पहाटे त्यांचा शिवारात शोध घेतला असता ग्रामस्थांना जंगलातील सालईच्या झाडाला एकाच दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू होती. (वार्ताहर)
छावणी येथील प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:43 IST