शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 6:00 PM

महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: मान्सूनच्या लहरी पणाचा मानवासोबतच पशुपक्ष्यांनाही फटका बसला आहे. पावसाने दिलेला खंड व खालावलेली जलपातळी यामुळे अनेक गाव तलाव कोरडे पडले असून, काही तलावच गाळामुळे नामशेष होत आहेत. त्यामुळे गोड्या पाण्याच्या काठी अधिवास कारणाºया पाण मयूर हे पक्षी सध्या आसºयासाठी कासावीस होत असल्याचे चित्र आहे. पाणपिपुली, पीयू, पीयूष, जलमयूर, पाणमयूर किंवा कमळपक्षी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाºया या सुंदर पक्ष्याचे जलीय परिसंस्थेशी अतूट नाते आहे. महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.मालगुजारी तलाव व इंग्रजांच्या दूरदृष्टीमुळे अनेक शहरे व गावालगत तलावाची निर्मिती केली. अनेक परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसह स्वदेशी पक्ष्यांचेदेखील हे तलाव माहेरघर बनले. आता मात्र लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराने व वाढत्या शहरीकरणामुळे तलावाच्या सौंदर्याला घरघर लागली. अमरावती जिल्ह्यातील छत्री, वडाळी तलाव, नागपूर जिल्ह्यातील फुटाळा, सोनेगाव, अंबाझरी तर वाशिम जिल्ह्यातील ऋषी तलाव हे उत्तम उदाहरण आहेत. अमरावती शहरालगतचा छत्री व वडाळी तलाव पूर्वी लाल व पांढºयाशुभ्र कमळ फुलांनी बहरून जायचा. येथील शेकडो कमळ पक्ष्यांसाठी नंदनवन म्हणून हा तलाव ओळखला जायचा. छत्री तलाव येथे झालेल्या विकासाकामुळे येथील कमळ पक्ष्यांची संख्या नाहीशी झाली आहे. विशेष म्हणजे जिथे पाणी आहे त्या तलावांमधील कमळ व इतर पाणपुष्प वनस्पतींचा नाश होत आहे. त्यांची जागा आता जलपर्णीसारख्या इतर विषारी प्रदूषणसूचक वनस्पतीने घेतली आहे. त्यामुळे जलप्रदूषणाने गुदमरत असलेल्या इतर जलाशयात कमळ पक्ष्यांचे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे. कमळ पक्ष्यांच्या वसाहती मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आल्या आहेत. अनेक तलावातील कमळ नष्ट झाल्याने कमळ पक्ष्यांची संख्या प्रचंड घटली आहे. म्हणून स्थानिक तलावातील विकासकामे कमळपुष्प आणि कमळ पक्ष्यांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा नव्याने तलावातील गाळ काढून, प्रदूषण कमी करून नैसर्गिकरीत्या कमळ वनस्पती वाढवली तर कमळ पक्ष्यांना अधिवास मिळेल.-@ यादव तरटे पाटीलवन्यजीव अभ्यासक,

 

टॅग्स :AkolaअकोलाNatureनिसर्ग